Buldhana Silver Price Hike : सध्या सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय. देशातील चांदीची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये चांदीचे दर एका महिन्यात चक्क 15 ते 16 हजारांनी वाढले आहे. चांदीचे दर चक्क 55 हजारांवरून 70 हजारांवर पोहोचले आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होण्यामागचं कारण नेमकं काय ते जाणून घ्या. 


बुलढाण्यातील चांदीची बाजारपेठ ही देशभरातील प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहे. रजतनगरी खामगाव असं या बाजारपेठेचं नाव असून सध्या या ठिकाणी 'चांदी में आंधी' असं काहीसं वातावरण आहे. याचं कारणही तसंच आहे. चांदीच्या बाजारपेठेत सध्या तेजी असून गेल्या महिन्यात चांदीचे दर जे 55 हजार रूपये प्रतिकिलो होते ते दर आता तब्बल 70 हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या महिनाभरात जवळपास किलोमागे चांदीचे दर 15 हजार रुपयांनी वाढल्याने चांदी व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, सोन्याबरोबरच चांदीचे दरही वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 


गेल्या पाच महिन्यांतील चांदीच्या दराचा आढावा : 


जून 2022 : 47 हजार रुपये प्रतिकिलो.


ऑगस्ट 2022 : 51 हजार रुपये प्रतिकिलो.


ऑक्टोबर 2022 : 60 हजार रुपये प्रतिकिलो.


नोव्हेंबर 2022 : 64 ते 65 हजार रुपये प्रतिकिलो.


डिसेंबर 2022 - 70 हजार रुपये प्रतिकिलो.


मागच्या पाच महिन्यांतील चांदीचे दर झपाट्याने वाढत चालले आहेत त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात चांदीचे दर 90 हजारांपर्यंत जाणयाची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 


दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असताना आता चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी बाजारपेठ देशातील चांदीची मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव शहरात चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं व्यापारी सांगत असून चांदीचा आजचा दर प्रतिकिलो 70,000 रुपये इतका झाला आहे. गेल्या महिन्यात हाच दर जवळपास 55 ते 56 हजार रु. प्रतिकिलोच्या घरात असताना मात्र आता अचानक भाववाढ झाली आहे. याची वेगवेगळी कारणे व्यापारी सांगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 


Gold Price : सुवर्णनगरी जळगावसह, पुण्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; प्रतितोळा सोन्याचा दर तब्बल 56 हजारांवर