एक्स्प्लोर

कडाक्याच्या थंडीत 200 वयोवृद्ध शेतकऱ्यांचे उपोषण, खामगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

खामगाव :  ज्या वयात आपल्या नातवंडांना खेळवाचं दिवस असतात. सुखा समाधानाने जगायचे दिवस असतात. त्या वयात काही वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

बुलढाणा, खामगाव :  ज्या वयात आपल्या नातवंडांना खेळवाचं दिवस असतात. सुखा समाधानाने जगायचे दिवस असतात. त्या वयात काही वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कडाक्याच्या थंडीत या ज्येष्ठ शेतकऱ्यांना आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आहे.? नेमके का हे ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसले आहेत...?  " खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा " अशी त्या शेतकऱ्यांची मागणी आहे. 1972 नंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे, असे त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांचं मत आहे. जवळपास 200 वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसलेत. पण सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही. 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव या गावात " खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा " , दुष्काळी परिस्थितीत ज्या घोषणा सरकारकडून करण्यात येतात , त्या घोषणा जाहीर करण्यात याव्यात. या मागणीसाठी गाव व परिसरातील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गावातील ग्राम पंचायती समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे . परिसरातील जवळपास 200 च्या वर ज्येष्ठ शेतकरी महिला व पुरुष या उपोषणात सहभागी झाले आहेत. 1972 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात परिसरात दुष्काळ पडल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या परिसरातील मागण्यांसाठी ज्येष्ठांना उपोषण करण्याची परिसरातील पहिलीच घटना असल्याने अनेक नागरिकही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये. 

गेल्या तीन दिवसापासून कडाक्याच्या थंडीत दिवस रात्र हे दीडशे ते दोनशे शेतकरी ज्यांचं वय साठीच्या वर आहे. या ठिकाणी आंदोलनाला व आमरण उपोषणाला बसले आहेत. ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसल्याने या परिसरातील तरुण शेतकरीही आता या आंदोलनात पाठिंबा द्यायला सरसावले आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या ज्येष्ठ नागरिकांच्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या आमरण उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही पाठिंबा दिला असून उद्यापासून अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते या ज्येष्ठ नागरिकांच्या आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत....

दरम्यान, ज्येष्ठांच्या या आंदोलनाची "एबीपी माझा" ने उपोषण स्थळी जाऊन दखल घेतल्याबद्दल या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी "एबीपी माझा"चे आभारही मानले आहे..

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget