एक्स्प्लोर

व्यभिचारी पत्नी घटस्फोटानंतर पोटगी मागण्यासाठी पात्र नाही : हायकोर्ट

घटस्फोटासाठी याचिका ही पतीच्यावतीनं करण्यात आली होती. तसेच पत्नीवरील व्यभिचाराचे आरोप सिद्ध झाल्यानं हा घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. तेव्हा या प्रकरणात पतीची कोणतीही चूक नसल्यानं पोटगी रद्द करण्याचा निर्णय हा योग्यच आहे.

मुंबई : व्यभिचारी पत्नी ही घटस्फोटानंतर पोटगी मागण्यासाठी पात्र ठरत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयानं एका घटस्फोटीत महिलेला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार घटस्फोटानंतरही महिला पतीची पहिली बायको म्हणून वावरू शकते, तसेच पहिली पत्नी म्हणून ती पोटगीसाठीही पात्र असते. मात्र या निकालांचे निकष व्यभिचार सिद्ध झाल्यामुळे दिलेल्या घटस्फोटांना लागू होत नाहीत. अशा प्रकरणांत केवळ पती स्वेच्छेनं तिला पोटगी देऊ करत असेल तर तो देऊ शकतो, मात्र पत्नीनं त्या रकमेस विरोध केल्यास पती पोटगी नाकारू शकतो. त्यामुळे याप्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयानं दिलेला निकाल कायम ठेवत हायकोर्टानं महिलेनं पोटगी नाकारल्याच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळून लावलं आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी नुकताच हा निकाल जाहीर केला आहे.
संबंधित प्रकरणात पती पत्नीचा 6 मे 1980 मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 27 एप्रिल 2000 मध्ये सांगली कुटुंब न्यायालयानं या दोघांचा घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणात बायकोवर व्याभीचाराचे आरोप करत नव-यानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे आरोप सिद्ध झाल्यानं कोर्टानं घटस्फोट मंजूर करत महिलेला 150 रूपये महिना आणि तिच्या ताब्यातील मुलाल 25 रूपये महिना उदर्निवाहासाठी पोटगी म्हणून देण्याचे निर्देश पतीला दिले होते. मात्र ही पोटगी अगदीच नाममात्र असल्यानं पत्नीनं ती वाढवून मिळावी यासाठी सांगली जिल्हा न्यायालयात अर्ज केला. साल 2010 मध्ये कोर्टानं हा अर्ज स्वीकारत पत्नीला दरमही 500 रूपये तर मुलाच्या खर्चासाठी दरमहा 400 रूपये पोटगी म्हणून देण्याचे निर्देश दिले.
या निकालाला पतीने आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल करत पोटगी रद्द करण्याची मागणी केली. 13 जुलै 2015 मध्ये सांगली जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरीक्त न्यायाधीशांनी पतीची ही याचिका मान्य करत पहिल्या पत्नीला मिळणारी पोटगी रद्द करण्याचे आदेश दिले. या निकालाला महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. घटस्फोटानंतर पोटगी मिळवणं हा महिलेचा कायदेशीर अधिकार असल्याचा तिचा दावा होता. मात्र पतीच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं की, घटस्फोटासाठी याचिका ही पतीच्यावतीनं करण्यात आली होती. तसेच पत्नीवरील व्यभिचाराचे आरोप सिद्ध झाल्यानं हा घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. तेव्हा या प्रकरणात पतीची कोणतीही चूक नसल्यानं पोटगी रद्द करण्याचा निर्णय हा योग्यच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget