एक्स्प्लोर

व्हिडीओशी भाजपचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणं चुकीचं, भाजपचं स्पष्टीकरण

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद शमत नाही तोच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. तान्हाजी सिनेमातील दृश्यांना मॉर्फ करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे.

मुंबई : तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हीडिओ पॉलिटिकल कीडा नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजप या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपची भूमिका आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान हा वादग्रस्त व्हिडीओ त्या पेजवरुन अखेर हटवण्यात आला आहे. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, सोशल मीडियाच्या बाबतीत कोण काही व्हिडीओ बनवून व्हायरल करेल यावर कुणाचा निर्बंध असू शकत नाही. हा वादग्रस्त व्हिडीओ अशाच प्रकारे कुणीतरी व्हायरल केला. भाजपच्या बाबतीत संशय निर्माण करून टीका करण्याचा विषय तयार करण्याचा डाव त्यामागे दिसतो. ते म्हणाले की, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. नेमकं काय घडलं? आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद शमत नाही तोच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. तान्हाजी सिनेमातील दृश्यांना मॉर्फ करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांची उदयभानशी तुलना करण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओवरुन महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या संपूर्ण वादानंतर अखेर पॉलिटिकल किडा या पेजने वादग्रस्त व्हिडीओ यू-ट्यूबवरुन काढून टाकला आहे. तान्हाजी चित्रपटावरुन व्हायरल झालेल्या वादग्रस्त राजकीय व्हिडीओवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. भाजपनं या व्हिडीओबाबत भूमिका स्पष्ट करावी. तर, केंद्र सरकारनं या बाबत चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. दरम्यान, या वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. संबंधित बातम्या  तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल  Tanhaji Spoof Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचं समर्थन नाही, वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी भाजपच्या राम कदमांची प्रतिक्रिया Tanhaji Political Spoof | तान्हाजीच्या पॉलिटिकल व्हिडीओमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक, व्यक्तिरेखांना मोदी, शाहांचे चेहरे लावल्याने वाद

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget