Bharat Gogawale, रायगड : "आम्ही प्रत्येक गावात विकास करतोय. मला सांगा तुम्हाला कोण पाहिजे. काम करणार भाऊ पाहिजे की, चूxx बनवणारी बहीण पाहिजे", असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी केलंय. ते रायगडमधील एका कार्यक्रमात बोलत होते. 


गोगावले यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर 


भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप चांगल्याच संतापल्या आहेत. बेताल वक्तव्य केलं की गोगावले यांना वाटतं मला प्रसिद्धी मिळते. बेताल वक्तव्य करून प्रसिध्दी मिळवण्याचं गोगावले यांचं जून नाटक आहे. एकिकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे महिलांबाबत अशी बेताल वक्तव्य गोगावले करतं आहेत. गोगावले यांनी केलेल वक्तव्य मला जाणून बुजून उद्देशून केलेल वक्तव्य आहे. ही आपली संस्कृती नाही. मी थेट मुख्यमंत्री यांना गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली, असं ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी म्हटलं आहे. 




स्नेहल जगताप संतापल्यानंतर भरत गोगावलेंची सारवासारव 


गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर स्नेहल जेगताप यांनी त्यांची नाराजी व्यक्त केल्यानंतर आमदार भरत गोगावले यांच्याकडून सारवासारव करण्यात आली आहे. एवढ कुणाला काही लागण्याची गरज नाही, जे कोणी आमच्या विरोधात वक्तव्य करतात, त्यांच्या विरोधात आम्ही बोलतो, असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं आहे. 


गावठी शब्दात एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, कोणाचा अपमान करायचा नव्हता


गावठी शब्दात एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, पण  आम्हाला कोणाचा अपमान करायचा नव्हता. समोरची मंडळी आमच्यावर आरोप करतात.त्यावेळी आम्हाला गावठी भाषेत जशास तस उत्तर द्याव लागतं. उपस्थित महिला भगीनींनी टाळ्या वाजवल्या, आम्ही सगळ्यांना बोललो नाही. जे कोणी आमच्या विरोधात बोलतात त्यांना आम्ही बोललो, कोणाच नाव घेतल नाही, असंही भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..


 Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?