Laxman Hake on Pankaja Munde, बीड : माजी मंत्री आणि भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि.11) भगवान गडावर पार पडणार आहे. दिवंगत भाजप नेते पंकजा मुंडे यांचे निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा पार पडतोय. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहेत. मी येतोय, तुम्हीही या, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 






वाजत गाजत भगवान गडावर या, लक्ष्मण हाकेंचे आवाहन 


लक्ष्मण हाके म्हणाले, मी उद्या सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर संत भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी येत आहे. तमाम महाराष्ट्राती बहुजन, भटक्या विमुक्त जाती आणि सर्व जनता भगवान गडाकडे येत आहे. सर्व मंडळींना माझं सांगणं आहे की, वाजत गाजत भगवान गडावर या. मी येतोय, तुम्ही सुद्धा यायचं आहे. आपला स्वाभिमान आणि अस्तित्वाची लढाई आणि सर्व बहुजनांनी ऊर्जा घेण्यासाठी भगवान गडावर या. दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने सोनं लुटुयात. 






पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष 


पंकजा मुंडे उद्या होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी सकाळी 11.15 ते 11.30 वा. दरम्यान सावरगाव घाट येथे हेलीकॉप्टरने पोहोचणार आहेत. हेलिपॅड वरून त्या थेट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि नंतर व्यासपीठाकडे रवाना होतील. याठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा, आरती करून त्या व्यासपीठावर येतील. प्रमुख भाषण हे  पंकजा मुंडे यांचेच असणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश