Bhandra Grampanchayat Election : सध्या राज्यात ग्राामपंचायत निवडणुकीची (Grampanchayat Election ) रणधुमाळी सुरु आहे. यामुळं गावागावतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भंडारा (Bhandra) जिल्ह्यातही 305 ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोमनाळा (Somnala) येथील सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या छबू दिगंबर वंजारी (Chhabu Vanjari) यांनी चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करत जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावागावात राजकीय  वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार भंडारा जिल्ह्यातील सोमनाळा येथील सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या छबू दिगंबर वंजारी यांनी चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कायद्याच्या चाकोरीत बसणारा या जाहिरनामा भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.




भंडाराऱ्यातील कोंढा ग्रामपंचायतची निवडणूक हायप्रोफाइल


भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा ग्रामपंचायतची निवडणूक हायप्रोफाइल निवडणूक ठरली आहे. भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांचा मुलगा अमित जीभकाटे सरपंचपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर, त्यांच्या विरोधात परमानंद कावळे हे सरपंचपदाची निवडणूक लढत आहेत. ते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर आणि पवनी पंचायत समितीच्या सभापती डॉ. नूतन कुर्झेकर यांच्या गटाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, जीभकाटे हे काँग्रेसचे तर, कुर्झेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यामुळं निवडणूक सरपंचपदाची होत असली तरी, यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती, जिल्हा परिषद अध्यक्ष जिभकाटे आणि माजी उपाध्यक्ष कुर्झेकर यांची. विशेष म्हणजे, अमित जीभकाटे हे यापूर्वी तीनवेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर परमानंद कावळे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. या दोघांमध्ये आता कोण निवडून येणारं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




7 हजार 751  गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी


राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7 हजार 751  गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. यासाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने गावोगावी राजकीय वातावरण चापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 




महत्त्वाच्या बातम्या:


Grampanchayat Election : ग्रामपंचायतींच्या मैदानात उमेदवारी अर्जांचा 'पाऊस', पाहा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार