भंडारा:  दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपयांची प्रोत्साहन राशी (बोनस) देण्याची घोषणा राज्य सरकारनं नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र, आता 24 फेब्रुवारीला राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात ज्या शेतकऱ्यांनी ई - पीक नोंदणी किंवा धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली असेल, अशाच शेतकऱ्यांना ही प्रोत्साहन राशी देण्याचे नमूद केले आहे. एकट्या भंडारा (Bhandara News) जिल्ह्याचा विचार केल्यास 50 टक्के शेतकरी या प्रोत्साहन राशीपासून वंचित राहणार आहेत.


भंडारा जिल्ह्यात सुमारे 2 लाख 55 हजार शेतकरी आहेत. यापैकी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर सुमारे 1 लाख 27 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानुसार अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या प्रोत्साहन राशीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित 50 टक्के शेतकरी या प्रोत्साहन राशीपासून वंचित झाले आहेत. ज्यावेळी ही पिक नोंदणी करायची होती, त्यावेळी अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. 


शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नव्हता त्यामुळे ही पीक नोंदणी करताना त्यांना अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे 50 टक्के शेतकऱ्यांची ही पीक नोंदणी झालेली नाही आता हे सर्व शेतकरी प्रोत्साहन राशीला मुकणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अशा कुठल्याही जाचक अडचणींना सामोरे जावे लागत नव्हते, केवळ ऑफलाईन पद्धतीने त्यांची नोंदणी झाल्यानंतरही त्यांना लाभ मिळालेला आहे. मात्र, आता शेतकरी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जात असल्याने आर्थिक संकटात सापडलेचं चिन्ह दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यासह धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यातीलही शेतकरी या प्रोत्साहन राशीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती उदासीनता दिसून येत आहे.


8 कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात 13 व्या हप्त्यात सुमारे 16,000 कोटी झाले जमा


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेळगावी येथे 2,700 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमादरम्यान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,000 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. यापूर्वी पंतप्रधान किसान योजनेचा 12 वा हप्ता दिवाळीपूर्वी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. नुकताच जाहीर झालेला 13 वा हप्ताही होळीपूर्वी आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :