भंडारा : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आपण कारवाई करणार का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विचारला आहे. दरम्यान, यावेळी त्यांची फडणवीसांवर कारवाई करण्याची हिंमत आहे का? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) विचारला आहे. जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत आहे. या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई करु, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेणार का? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 


काय म्हणाले नाना पटोले?


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधाला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, "गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे की, मी सौम्य लाठाचार्ज करण्यास सांगितला होता. यांनी मोठ्या प्रमाणात केला. मग लाठीचार्ज करण्याचा आदेश देणार हाच गुन्हेगार आहे." तर याप्रकरणाची सखोल चौकशी करणार का? असा सवाल देखील यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. "अजित पवारांनी जर गृहमंत्र्यावर कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी त्यांचं उपमुख्यमंत्री पद जाईल' असा दावा देखील यावेळी नाना पटोले यांनी केला आहे. तसेच 'जी स्थिती आहे ती जनतेसमोर मांडण्याची हीच संधी आहे', असा सल्ला देखील नाना पटोले यांनी केला आहे. 


"सत्तेसाठी फडणवीसांनी भीमगर्जना केल्या होत्या"


"सत्तेसाठी फडणवीसांनी मोठ्या भीमगर्जना केल्या होत्या. त्याचा विसर भाजपला पडला आहे", असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला आहे. तर 'बावनकुळे यांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाट असा पलटवार नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंच्या सरकारनं अडीच वर्षात बट्ट्याबोळ केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की, 'बावनकुळे यांना फडणवीस यांना त्यांची भाषणं ऐकवावीत कारण त्यांना त्यांचा भाषणांचा विसर पडला आहे.' 


विरोधक आक्रमक 


जालन्यामध्ये मराठा समाजाच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीजार्च करण्यात आला. यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. तर विरोधक देखील या घटनेमुळे चांगेलच आक्रमक झाले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jalna Maratha Reservation agitation : जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल, ट्रक जाळून चालकांसह क्लिनरला मारण्याचा प्रयत्न