भंडारा : सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासऱ्यानं सूनेची कुऱ्हाडीनं अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर (24) असे मृत सुनेचे नाव आहे. सुनेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील अंगणात कापडाने झाकून ठेवत सासऱ्याने मोहाडी पोलिसात आत्मसमर्पण केलं.
या धक्कादायक हत्या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी बळवंत ईश्वरकर (57) असे गुन्हा दखल करून अटक केलेल्या आरोपी सासऱ्याचे नाव आहे. आरोपी सासरा यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते मुलगा, सून आणि एका नातवासह रोहना गावातील घरी राहत होते. मात्र, सासरा बळवंत याचा सून प्रणाली हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे घरात सासरा आणि सून यांच्यात वाद होत होता.
शुक्रवारी सकाळी मृतक प्रणाली हिचा पती हा शेतात गेला असताना सासऱ्याने सूनेसोबत वाद घातला आणि तो वाद विकोपाला गेला. यातच सासऱ्याने घरातील धारदार कुऱ्हाड आणून घराच्या बाहेर भांडी घासत असलेल्या सूनेवर सपासप वार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेनंतर सासऱ्याने घरातून कापड आणून सुनेवर झाकलं आणि मोहाडी पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच मोहाडीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लारवार हे आपल्या पथकासह रोहना गाव गाठत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
छोट्या मुलाने सांगितली हकीकत
हे हत्याकांड घडलं तेव्हा घरात मृतक प्रणाली, सासरा आणि प्रणालीचा छोटा मुलगा तिघेच होते. हत्या केल्यानंतर सासरा घरातून निघून गेला. ही हत्या होताना प्रणालीचा मुलगा घरी होता, त्याने हे सर्व घटना वडिलांना सांगितल्याने खळबळ उडाली.
बापाने सुपारी देत केली मुलाची हत्या
जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. पोलिसांनी काही तासांमध्येच या प्रकरणाचा उलगडा करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तारदाळमध्ये (ता. हातकणंगले) ही घटना घडली. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. शहापूर पोलिसांकडे याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
ही बातमी वाचा: