Bhandara News : गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार (Rain) पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं आज सकाळपासून गोसीखुर्द धरणाचे पाच गेट अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहेत. या पाच गेटमधून 19551 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


आणखी धरणाचे गेट उघडण्याची शक्यता  


गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील काही तासात धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. कालपासून गोसीखुर्द धरणाचे तीन वक्रद्वार दरवाजे अर्धा मिटरनं उघडून त्यातून 11656 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आज यात आणखी दोन गेट उघडून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा  करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.


या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा 30 जूनला गोसीखुर्द धरणाचे तीन वक्रद्वार अर्धा मिटरनं उघडून त्यातून 17 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंत काल रात्रीपासून पुन्हा एकदा पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.


Maharashtra Rain : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस


राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल आहे. तर पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात मध्यम सरी बरसतील. तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अमरावती, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडच आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: 


Bhandara News : खोदकाम एकाच्या शेतात, मोबदला दुसऱ्याला; गोसीखुर्द धरण प्रशासनाचा भंडाऱ्यात अजब कारभार