एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही 'हिंसक वळण'; नांदेडसह बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक

Maratha Reservation : बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रवाशांना आधीच खाली उतरवण्यात आल्याने कोणतेही जीवितहानी झालेली नाही. 

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे सुद्धा समोर येत आहे. आज देखील बीड (Beed) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रवाशांना आधीच खाली उतरवण्यात आल्याने कोणतेही जीवितहानी झालेली नाही. 

बीडमध्ये रात्रीपासूनच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक लागल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री मराठा आंदोलकांनी एका बसला आग लावल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा कल्याण-बीड या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. यामध्ये बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर, रात्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलकांनी पालीजवळ एका बसला आग लावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. 

नांदेडमध्येही बसवर दगडफेक...

बीडप्रमाणेच नांदेड जिल्ह्यात देखील आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. तर, आज पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली आहे. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय. या प्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेतायत.

अज्ञात लोकांनी पेटवून दिली एसटी बस...

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. बसमध्ये असलेले सर्व 73 प्रवाशी सुरक्षित आहेत. मात्र, लावलेल्या या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झालीय. नांदेडच्या हदगांव आगाराची ही बस नागपूरकडे जात होती. त्याचवेळी मराठवाडा - विदर्भ सीमेवरच्या पैनगंगा नदीच्या पुलावर बसला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावलीय. या घटनेमागे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा हाथ असावा अशी शक्यता वर्तवली जातेय. कारण विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगांव तालुक्यात मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मोठया प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, बस पेटवून देणारे नेमके कोण होते याचा पोलीस शोध घेत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed : मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला, आंदोलकांनी बीडमध्ये धुळे- सोलापूर महामार्ग रोखला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget