एक्स्प्लोर

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात प्रीतम मुंडेंशेजारी स्थान, पंकजा मुंडेंचा मुलगा थेट व्यासपीठावर; बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?

Pankaja Munde: मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी एका मुलाची ओळख करुन दिली. त्या युवकाला व्यासपीठावर बोलवले आणि त्याला जवळ घेत पंकजा म्हणाल्या, हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन.

Pankaja Munde: आज भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा भगवानगडावरील दसरा मेळावा पार पडत आहे (Dasara Melava 2024) या मेळाव्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) १२ वर्षांनी उपस्थित आहेत. ते या भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील चर्चेचा विषय ठरले होते, मात्र, आमदार पंकजा मुंडे यांनी जमलेल्यांना संबोधित करताना त्यांच्या मुलाला समोर बोलावलं आणि त्याची ओळख यावेळी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा माझ्यापेक्षा फार उंच. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. हा भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या मुलाला पुढे बोलून आर्यमान याची ओळख करून दिली. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दसरा मेळाव्यातून आर्यमनचं लाँचिंगच्या चर्चा सध्या सुरू आहेत. 

हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे, आज भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे, तो मला फार प्रिय आहे, असं वाटतं असेल ना तुम्हाला, हे माझं लेकरू आहे म्हणून ते प्रिय  आहे, असं वाटतं असेल ना पण, मी त्याला सांगितलं आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला हे लोक प्रिय आहेत. कारण माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तर, या बह्हादरांनी माझ्यासाठी बारा कोटी जमा केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त तुमच्यावर जीव लावते, आणि तुम्ही माझ्यावर, मला बास इतकंच पाहिजे, बाकी काही नको.

तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितले आहे, तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे. जेव्हा माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. तेव्हा १२ कोटी रुपये या जनतेने भरले. या लोकांनी मला जीव लावला. तुम्ही सर्वांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केले. आता मला काही नाही पाहिजे, असे भावनिक भाषण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले.

पुढे पंकजा मुंडे व्यासपिठावरील मान्यवरांची ओळख करून देताना म्हणाल्या, माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला, त्यावर एकच हस्यकल्लोळ उठला. गोंडस लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही. काल त्यांनी व्हिडिओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाला. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण माझा सन्मान ठेवून हाके आले. 


मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget