Manoj Jarange Patil, बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला अखेर पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाने नारायण गडावरील दसरा मेळाव्याला परवानगी दिली. मागच्या नऊ दिवसांपासून मराठा समन्वयकांनी परवानगी मागून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. 


दसरा मेळाव्याला पोलीस प्रशासनाकडून 16 अटीशर्थी 


दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाने 16 अटी ठरवून दिल्याचे सांगितले आहे. पार्किंगची व्यवस्था आणि दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची आसन व्यवस्था करण्याच्या अटी शर्थीने अखेर नारायण गडवरील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे.


मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर जरांगे काय म्हणाले? 


मनोज जरांगे पाटील म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामुळे परवानगीचा काही विषय येणारच नव्हता. ऐकायला मिळालं होतं की नाही म्हणून पण एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब चांगले आहेत. परवानगी तर मिळणारच होती, गोरगरिबांचा दसरा मेळावा आहे. मराठा बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता आणि शांततेत जायचं आहे. लोकांचा आकडा सांगता येणार नाही.परंतु 10 आले काय आणि 1000 आले का लाख आले काय तरी कार्यक्रम होणार आहे. मात्र लोक घरी थांबत नाही बीड जिल्ह्यातील एकही माणूस घरी थांबणार नाही.


 मेळाव्याला हेलिकॉप्टरने एन्ट्री करावी, समाजाची मागणी आहे मान्य करणार का? 


भावना होत्या समाज बांधवांची हजारोच्या संख्येने गडावर म्हणत होते हेलिकॉप्टरने जायचं. माञ आपण गरिबांचा लढा लढतो आपले बांधव त्यात बसून अधिकारी होऊन आले पाहिजेत. समाज मोठा करण्याच माझं स्वप्न आहे. मी भूशाणात जगणारा नाही ,मोठेपणात वागणारा नाही. समाजाचं म्हणणं होतं गडावर गर्दी होणार आहे. गर्दीतून तुम्हाला येता येणार नाही. एकही हेलिकॉप्टर नको ते मी रद्द केल आहे.


मनोज जरागेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाई फेकल्यानंतर हाकेंची टीका 


मनोज जरागेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाई फेकल्यानंतर ओबीसी नेते लक्षण हाके यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात मोगलाई आहे की काय? अशी परिस्थिती या कृतीतून दिसून येते, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक लक्ष्मण हाके त्यांनी नाशिक येथील डॉक्टरला काळे फासण्याच्या घटनेवरून दिली. कोणी आपलं मत मांडलं असेल तर त्याचे उत्तर मत खोडून होऊ शकते , पण अशा पद्धतीने मोगलाई सदृश्य , निजामा सदृश्य घटना या राज्यात घडत असतील तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा नाही असा आम्हाला वाटतं,असं हाके म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sharad Pawar NCP : संपूर्ण खालसा झालेल्या पक्षाला शरद पवारांकडून नवसंजीवनी, इच्छुकांची तोबा गर्दी, पुण्यात उमेदवारीसाठी 1280 जणांच्या मुलाखती