Manoj Jarange Patil, बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नारायणगड (Narayan Gad) येथील दसरा मेळाव्याला पोलीस प्रशासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. दसरा मेळाव्यासाठी 30 सप्टेंबरला पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. दसरा मेळाव्याच्या परवानगीमुळे आयोजक आणि पोलीस प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. 


बीडच्या श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथे मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दसरा मेळाव्याच्या कमिटीने रितसर परवानगी संदर्भात  पत्र देण्यात आले होते. जिल्हा पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागून आज नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे संयोजन समितीने सांगितले आहे.


मेळावा दोन दिवसांवर आला तरी अद्याप परवानगी नाहीच 


 मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पोलीस प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही परवानगी दिली नाही परवानगी देण्यास चालढकलपणा करण्यात येत असल्याचे यावेळी संयोजक समितीने सांगितले आहे. परवानगी दसरा मेळावा होणार म्हणजे होणार असा इशारा देखील संयोजन समितीकडून देण्यात आलाय. परवानगी संदर्भात दसरा मेळावा संयोजन समितीमध्ये आणि  समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आता  मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.


मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर भाजपचे उमेदवार पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आता मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दसरा मेळाव्यात मनोज जरांगे आगामी विधानसभा निवडणूक उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून आरक्षणाबाबत कोणता निर्णय घेण्यात येणार का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान


Ajit Pawar: अजितदादांना बालेकिल्ल्यात धक्का? माजी आमदाराने दौऱ्याकडे फिरवली पाठ; शरद पवारांची घेतलेली भेट