एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीडवर देवेंद्र फडणवीसांचे विशेष लक्ष? चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे बीडला येणे टाळायचे. आता मात्र उलट पाहायला मिळत आहे फडणवीसांचा बीडकडचा ओढा वाढला आहे.

बीड:  पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) बालेकिल्ला असलेल्या बीडवर (Beed)  देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  विशेष लक्ष केंद्रीय केलंय का याची राजकीय गोटात चर्चा सुरु झाली आहे. अर्थात त्यामागचं कारणही तसंच आहे. 1 जानेवारीनंतर उद्या म्हणजे 15 जानेवारीला देखील देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 

1 जानेवारीला विनायक मेटेंच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. मात्र मुंडे भगिनी या कार्यक्रमात न दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली होती. दोन आठवड्यामध्ये दोनदा फडणवीस हे बीडला येत आहेत. एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि उद्या गहिनीनाथ गडावर होणाऱ्या संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास ते हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे बीडला येणे टाळायचे. आता मात्र उलट पाहायला मिळत आहे फडणवीसांचा बीडकडचा ओढा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये तर्फन पुरस्काराला सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. याउलट मुंडे भगिनी मात्र फडणवीसांच्या यापूर्वीच्या कार्यक्रमाला गैरहजर होत्या. काल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या बीडमध्ये आल्या असतानाही प्रीतम मुंडे अथवा पंकजा मुंडे कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. उद्याच्या गहिनीनाथ गडाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्या तरी बीडच्या भाजपमध्ये सगळं काही आलबेल आहे असं म्हणणं थोडं घाईच ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा होत्या. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली नाही. वारंवार डावललं जात असल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget