Maharashtra Beed Manjra Dam Water level Updates: लातूर (Latur) शहरासह केज (Cage), धारूर (Dharur), अंबाजोगाई (Ambajogai), कळंब (Kallam) आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण अर्धा पावसाळा संपला तरी रिकामंच आहे. सध्या मांजरा धरणात केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अर्धा पावसाळा संपला तरीही धरण रिकामंच असल्यानं राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची चिंता वाढली आहे. 

अर्धा पावसाळा संपला तरी तीन जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात (Manjra Dam) पुरेसा पाणीसाठा न झाल्यानं मांजरा धरण मृतसाठ्याकडे जात असून सध्या केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक राहिला आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील अनेक गावांची तहान भागवणारं मांजरा धरण आता मृत्यू साठ्याच्या उंबरठ्यावर पोहोचलं असून धरणामध्ये फक्त 25 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाण्यासाठी वर्षभर मांजरा धरणावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता आता वाढली आहे.


कैसे तालुक्यातल्या धनेगाव येथे हे मांजरा धरण असून गेल्या तीन वर्षांपासून सलग धरणामध्ये मोठा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यावर्षी पावसा अभावी धरण्यात पाण्याचा साठाच झालेला नाही. तर दुसरीकडे 20 ते 22 दिवसांपासून पावसानं मोठा खंड दिल्यानं मांजरा धरणासह जिल्ह्यातील इतर मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली नाही.  

विभागात पावसाची तूट...

जिल्हा  पावसाची तुट 
परभणी 40 टक्के 
औरंगाबाद  29.8 टक्के 
जालना 31.6 टक्के 
बीड  25.4 टक्के 
लातूर 21.2 टक्के 
उस्मानाबाद  23.5 टक्के 
हिंगोली 14.6 टक्के 
नांदेड  14 टक्के जास्त पाऊस 

मराठवाड्यातील पावसाची स्थिती 

यावर्षी मराठवाडा विभागात उशिरा मान्सून दाखल झाल्याने 10 जूनऐवजी ‎25 जूनला मान्सूनचे आगमन झाले.
मराठवाड्यातील 30 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, 134 मिमी अपेक्षित‎पावसाच्या तुलनेत केवळ 55.5 मिमी ‎म्हणजेचं 41.4 टक्केच पाऊस ‎पडला. 
जुलै महिन्यात 182.2 मिमीच्या तुलनेत 272.5 मिमी म्हणजेच 49 ‎टक्के जास्त पाऊस पडला.
मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मागील 20 दिवसांत 28.1 टक्के पाऊस झाला असून, 71.9 टक्के तुट पाहायला मिळत आहे.

पाणी टंचाईचा सामना करावा लागणार... 

पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांना फटका बसत असतांना, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळू शकते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पाणीटंचाई! पाण्याच्या बचतीसाठी अर्ध्या गावाने अंघोळ करणं सोडलं; मराठवाड्यातील भीषण वास्तव