आष्टी, बीड : बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्याने आपल्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातल्या (Beed) आष्टी तालुक्यातील (Ashti) एका गावामध्ये ही घटना घडली आहे. आरोपी 30 वर्षीय चुलत्याने आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केला. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन या नराधम काकाने तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान ही बाब समोर आली. धक्कादायक म्हणजे ही पीडित अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. यामध्ये नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. अशीच घटना आता बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नात्यातील व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी चुलत्याचे काही दिवसापूर्वी विवाह झाला होता. मात्र, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याने तो आपल्या भावाच्या घरी राहत होता. घरात कोणी नसताना डाव साधून त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तर या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी अत्याचार सहन करत होती. मात्र अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
या सर्व प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वाच्यता झाल्याने आरोपी काकाने पळ काढला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पलायन केलेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.
9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, न्यायालयाने सुनावली 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
बीड जिल्ह्यामधीलच अंबाजोगाई तालुक्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने वीस वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. किरण शेरेकर अस या आरोपीचे नाव असून, दीड वर्षापूर्वी त्याने एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर यावर निकाल देतांना न्यायालयाने आरोपी किरणला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: