एक्स्प्लोर

Beed Rain Update: बीडमध्ये जोरदार पावसाचा तडाखा; मांजरा प्रकल्प तब्बल 80 % भरला, धाराशिव लातूरसह बिदर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

manjara dam: मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झालीय.

Beed : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्प तब्बल 80 टक्क्यांपर्यंत भरला असून, पुढील दोन दिवसांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूरस्थितीचा इशारा

जर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला, तर मांजरा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

गावकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

नदीकाठच्या गावकऱ्यांनी अनावश्यक धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. विशेषतः पूरकाठावरील शेती, जनावरांचे चारण तसेच घरांची सुरक्षितता याकडे ग्रामस्थांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाऊस अजूनही कायम

हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. .

गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे बीड मधील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा 80 टक्क्याच्या वर पोहोचलाय. मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झालीय. 15 ऑगस्ट रोजी दुपारी या धरणात 57 टक्के असलेला पाणीसाठा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता थेट 80 टक्क्यावर पोहोचला आहे. यामुळे आता पुढील दोन वर्षापर्यंत परिसरातील पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा एक असून याच मांजरा धरणातून बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी देखील वापरण्यात येते.

पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा, साळेगाव,मोगरा, गावासह परिसरातील तब्बल पंधरा गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. परिसरातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget