एक्स्प्लोर

Crop Insurance Scam : बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत; चक्क एमआयडीसीच्या जागेवर काढला विमा

Crop Insurance Scam : चक्क बीड नगरपालिकेच्या जमिनीला गायरान जमीन दाखवून याच जमिनीचा 30 हजार रुपयांचा पिक विमा भरण्यात आला आहे.

बीड : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात सतत पीक विमा घोटाळ्याचे (Crop Insurance Scam) प्रकार समोर येत आहे. दरम्यान, आता याच बीड शहरात पीक विमा घोटाळ्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कारण, चक्क बीड नगरपालिकेच्या जमिनीला गायरान जमीन दाखवून याच जमिनीचा 30 हजार रुपयांचा पिक विमा (Crop Insurance) भरण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत असल्याचे समोर आले आहे. सोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील या घोटाळ्याचा संबध असल्याचे समोर येत आहे.

शेतीचा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून, पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेमध्ये आता बोगस पीक विमा भरून लाभ घेणाऱ्यांची टोळी बीडमध्ये सक्रिय असल्याचे समोर येत आहे. यामध्ये, नगरपालिका आणि एमआयडीसीची जागा ही गायरान जमीन दाखवून 264 जणांनी बारा हजार हेक्टर जमिनीचा पिक विमा भरला आहे. हा सर्व प्रकार कृषी विभागाने महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा असून, याच ठिकाणी पीक विमा घोटाळ्याचे एकामागून एक प्रकरण समोर येत आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे प्रकार समोर आल्यावर, भारतीय पीक विमा कंपनीकडून याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीक विमा कंपनीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे नवीन प्रकरणं आता समोर येत आहेत. विशेष म्हणजे, तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील काही व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर विमा उतरवल्याचा धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. अशा प्रकारे बोगस विमा काढणाऱ्यांची संख्या मोठी असून, ही रक्कम 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तपासणी पिक विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 

चक्क एमआयडीसीच्या जागेवर भरला पीक विमा...

सरकारने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान, याचाच फायदा उचलत बीड जिल्ह्यात काहींनी विम्याचा मोबदला लाटण्यासाठी खोटी माहिती भरून पीक विमा घोटाळा केला आहे. यावेळी, एमआयडीसी परिसरातील 467 एकर जमीन शेती असल्याचे दाखवून पीक विमा भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तब्बल 180 लोकांच्या नावावर हा विमा भरण्यात आला होता. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असतांना अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Crop Insurance Scam : कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही भरला विमा; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीक विमा घोटाळे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Beed Accident Case : रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
रेस लागली नव्हती आणि माझा मुलगाही गाडी चालवत नव्हता, बीड अपघात प्रकरणात भाजप नगरसेवकाचा दावा; गायकवाड दाम्पत्याचा तडफडून मृत्यू
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Embed widget