Pankaja Munde Dasara Melava Live Updates : माझ्यामुळे तुमच्या अपेक्षा भंग होतो, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी
Pankaja Munde Dasara Melava Live Updates : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दसरा मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधी झुकणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली. माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आणि त्याचं भाषण संपवलं.
माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी मी मैदान उतरणार आणि तुमची साथ असेल तर मला तिथून कोणी हटवू शकत नाही, असं पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं.
वेळ पडल्यास कापूस वेचायला जाईन, ऊस तोडायला जाईन, पण मेहनतीचं खाईन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या जनतेसाठी मी आता मैदानात उतरणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं. यावेळी मी पडणार नाही, मी पाडणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
निवडणुकीत जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेऊ शकत नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. माझ्यावर इतर कुणाचं कर्ज नाही, तर माझ्यावर कर्ज तुमचं आहे, असं पंकजा मुंडेंनी जनतेला उल्लेखताना म्हटलं.
मी लोकांचे पैसे नाही, आशीर्वाद मात्र नक्की घेणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या लोकांना माझ्यामुळे फक्त त्रास होत असल्याचं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेची निष्ठा इतकी लेचीपेची नाही, माझ्याकडे पद नसतानाही माझी जनता माझ्यासोबत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, सरकारकडून लोकांना अपेक्षा असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी फक्त वंचितांसाठी काम केलं, कधी जात-धर्म पाहिला नाही, गोरगरिबांसाठी काम केलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला माहीत नाही मी तुम्हाला काय देऊ शकेल, पण मी तुम्हाला स्वाभिमान मात्र नक्कीच देऊ शकते, असं पंकजा मुंडे जनतेला म्हणाल्या. मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचंही त्या म्हणाल्या.
शिवशक्ती परिक्रमेला जनतेने मला चांगला प्रतिसाद दिला, अतोनात प्रेम दिलं आणि अशा या जनतेला, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंच्या भाषणादरम्यान माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. माईकची वायर कुठेतरी कट झाली, यानंतर पंकजा मुंडेंनी टोला लगावला. सभेत कुणीतरी फुटलं आहे आणि त्याने वायर कट केली असावी, पण माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यवधी जमा केले. दोन दिवसांत तुम्ही 11 कोटींचा चेक जमा केला, असं पंकजा मुंडे जमलेल्या जनसमुदायाला म्हणाल्या आणि जनतेचे आभार मानले.
ज्यांना पदं दिलं आहेत, ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. परंतु माझी जनता कधीही माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. निवडणुकीत पडले तरी चालेल, पण कधी तुमच्या नजरेतून पडायला नको, असं पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला इतकं प्रेम मिळेल असं मला वाटलं नव्हतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सर्व कार्यकर्त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं.
उन्हातान्हात सभेला हजर झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनसमुदायाचे पंकजा मुंडेंनी आभार मानले.
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भगवान बाबा की जय म्हणत पंकज मुंडेंच्या भाषणाला सुरुवात झाली.
भगवान भक्तिगड ट्रस्टच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला. सभेआधी साडी-चोळी आणि पुष्पाहार देऊन पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरुवात होत आहे, यासाठी पंकजा मुंडेंचं व्यासपीठावर आगमन झालं आहे.
थोड्याच वेळात पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बीडमध्ये जनमुदायाला संबोधित करणार आहेत.
पंकजा मुंडेंचं सावरगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी अवघा जनसागर लोटला आहे.
पंकजा मुंडे बीडच्या सावरगावमध्ये सभास्थळी पोहोचल्या आहेत.
पंकजा मुंडे येण्याअगोदर सभास्थळी गोंधळ झाला. सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या हजेरी अगोदर सभास्थळी गोंधळ झाल्याचं चित्र दिसून आलं. काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का असा सवाल कार्यकर्त्यांकडून होत असून गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढण्याचं आवाहन केलं जात आहे. गोंधळ घालणाऱ्यांना समज देण्यासाठी पोलीस सभेमध्ये पोहोचले आहेत.
Pankaja Munde Dasara Melava Live Updates : पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाजप पक्षातील त्यांना मिळणाऱ्या संधी संदर्भात अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता पुन्हा पंकजा मुंडे काय बोलणार याकडे मुंडे समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत.
Pankaja Munde Dasara Melava Live Updates : सावरगाव येथील दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे या परळी येथील निवासस्थानावरून आता रवाना झाल्या आहेत, त्यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतलं आहे. आता त्या गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने सावरगाव घाट या ठिकाणी दसरा मेळावासाठी रवाना होणार आहेत.
Beed Pankaja Munde Live Updates : दसरा मेळावा कुणीही घेऊ शकतं, सर्वांना शुभेच्छा : पंकजा मुंडे
'जे बोलायचं आहे, ते दसरा मेळाव्याच्या मंचावर बोलेन', अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. थोड्याच वेळात पंकजा मुंडे बीडच्या सावरगावमधील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली होती आणि यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर जी कारवाई झाली आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील देवीचे होम हवन केले.
बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार असून पंकजा मुंडे सकाळी वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर दाखल होतील आणि पुढे त्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत.
सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक संदेश ही देणार असल्याची चर्चा आहे.
पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी म्हटले की, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी लोकांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. लोकांनीच हा मेळावा हाती घेतल्याची परिस्थिती आहे. लोकांनी स्वत: हून मेळाव्याचा प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले. शिवशक्ती परिक्रमा झाली आहे.
Pankaja Munde : आज बीडमधील दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे कोणता राजकीय, सामाजिक संदेश देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Pankaja Munde Dasara Melava : भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
पार्श्वभूमी
Pankaja Munde Live Updates : भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याआधीच्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता, मंगळवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात दसऱ्यानिमित्ताने होणाऱ्या काही दसरा मेळाव्यांना महत्त्व आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा याचा समावेश होतो. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे.
दसरा मेळाव्यात पंकजा कोणत्या मुद्यावर करणार भाष्य?
सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक संदेश ही देणार असल्याची चर्चा आहे.
बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. पंकजा मुंडे या सकाळी वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर दाखल होतील आणि अभिवादन करतील. त्यानंतर सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली होती आणि यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली होती. सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे यावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील देवीचे होम हवन केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -