Beed : बीड जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर; हे गट OBC, SC, ST साठी राखीव
Beed ZP Reservation : बीड जिल्ह्यामध्ये 69 जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं.
बीड: बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आरक्षण काढण्यात आलं आहे. बीड जिल्हा परिषदेचे 69 गट आहेत. त्यामध्ये ओबीसीसह महिला आणि एससीचे आरक्षण काढण्यात आले. एससीसाठी नऊ गट राखीव पडले आहेत. जि.प.चे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले आहे. तर पं.स.चे आरक्षण तालुकानिहाय तहसिल कार्यालयामध्ये काढण्यात आले. यावेळी अनेक इच्छुकांची उपस्थिती होती. काहींसाठी सोयीचे गट पडले तर काहींना अडचणी निर्माण झाल्या. ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय सुप्रिम कोर्टाने घेतल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण काढण्यात आलं.
बीड जि.प., पं.स.चे आरक्षण
घोषीत, 20 खुला प्रवर्ग पुरुष, 21 सर्वसाधारण महिला, 18 ओबीसी तर 9 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित.
गटांसाठी जाहीर झालेले आरक्षण आरक्षण
अनुसूचित जातीसाठी आरक्षित गट
उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गट - जिरेवाडी
ओबीसीसाठी आरक्षित गट
रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी हे 9 गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित गट-
ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर या गटांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे वर्चस्व
बीड जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात होती. मात्र अडीच वर्षांपूर्वी राज्यामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आलं आणि बीड जिल्हा परिषदेमध्येसुद्धा सत्तांतर झालं. कारण बीड जिल्ह्यातील शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला आणि तो राष्ट्रवादीला दिला. धनंजय मुंडे यांनी शिवसंग्राम तसेच भाजपातील काही बंडखोर जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन पंकजा मुंडे यांना धक्का देत बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर केले होते. गेल्या अडीच वर्षापासून बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.