एक्स्प्लोर

Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम

Urea Shortage India : युरिया खताच्या निर्मितीसाठी एलएनजी हा प्रमुख कच्चामाल म्हणून वापरला जातो. त्यासाठी आखाती देशाकडून एलएनजी आयात केलं जातं. 

बीड : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताच्या टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे लिक्विड नॅचरल गॅस (LNG) पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका खत उत्पादन क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खरीप हंगामापूर्वी टंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आगामी खरीप हंगामासाठी बीड जिल्ह्याने सुमारे 64 हजार मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्षात किती साठा उपलब्ध होईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

LNG Crisis India : एलएनजी तुटवड्याचा खत उत्पादनावर परिणाम

युरिया खताच्या निर्मितीसाठी एलएनजी हा प्रमुख कच्चामाल म्हणून वापरला जातो. भारतातील 18 हून अधिक खत उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावर अखाती देश आणि रशिया येथून गॅस किंवा तयार युरियाची आयात करतात.

मात्र युद्धामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे एलएनजीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून, खत प्रकल्पांना गॅस पुरवठा कमी झाला आहे. परिणामी युरिया उत्पादनाची गती मंदावली आहे.

Kharif Season Impact : खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती

युरिया हा खरीप हंगामातील प्रमुख खत असल्याने या टंचाईचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यास बाजारात खताचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Expert Reaction On Urea Shortage : तज्ज्ञांकडून इशारा

या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया अ‍ॅग्रो इनपुट डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कलंत्री यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, एलएनजी तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम होत असून, सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम आता थेट भारतीय शेतीवर होत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, खरीप हंगामापूर्वीच खत टंचाईची भीती निर्माण झाली आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget