एक्स्प्लोर

Beed Teacher Accident : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 'गुरुजीं'चा अपघात; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू

Beed Teacher Accident : मुर्शदपूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारणे पाठीमागून जोराची धडक दिली, आणि यामध्ये या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Beed Teacher Accident : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात (Accident) होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघाताची घटना ताजी असतानाच आता बीड (Beed) जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. मोटारसायकल आणि कारच्या भीषण अपघात झाला असून, यात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी अपघातग्रस्त दुचाकी वाहनाने पेट घेतल्याने ती जागीच जळून खाक झाली. शहादेव शिवाजी डोंगर (वय 50, रा. जाट नांदूर) आणि अंकुश साहेबराव गव्हाणे (वय 48) अशी मयत प्राध्यापकांची नावं आहेत. 

बीडच्या शिरूरजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहादेव डोंगरे आणि अंकुश गव्हाणे अशी या प्राध्यापकांची नाव आहेत. हे दोन्ही शिक्षक शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होते. दरम्यान आज सकाळी नेहमीप्रमाणे ते बीडवरून शिरूर येथे महाविद्यालयाकडे निघाले होते. तर मुर्शदपुर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारणे पाठीमागून जोराची धडक दिली, आणि यामध्ये या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

दुचाकी जळाल्याने दोन्ही प्राध्यापकांचे मृतेदहही होरपळले

महाविद्यालयाकडे निघालेल्या शहादेव डोंगरे आणि अंकुश गव्हाणे या शिक्षकांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. मात्र अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला आणि दुचाकी जळून खाक झाली. तर दुचाकी जळाल्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही प्राध्यापकांचे मृतेदही होरपळले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही प्राध्यापकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना समोर आल्याने बीड शहरासह शिरूरच्या कालीकादेवी महाविद्यालयात शोककळा पसरली.

महाविद्यालयात शोककळा... 

अपघातात मृत्यू झालेले दोन्ही शिक्षक शिरूरच्या कालीकादेवी महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करत होते. तर  महाविद्यालयात जात असतानाच त्यांचा अपघात झाला आणि त्यात मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती महाविद्यालयात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. तर अपघाताची माहिती कळताच महाविद्यालयातील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तर दोन्ही शिक्षकांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची देखील रुग्णालयात गर्दी पाहायला मिळाली. तर या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

समृद्धी महामार्गाला अपघातांचा विळखा? पुन्हा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget