बीड : पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या कैलास फड याच्यासह इतर दोघांना बीड जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. कैलास फड आणि इतर दोघांचेही पिस्टलचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमावर पोस्ट केला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी अशा पद्धतीने समाज माध्यमावर दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


पिस्टलमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कैलास फड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटकदेखील झाली होती. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शस्त्र परवानाधारकांची फेर तपासणी करण्यात आली. यानंतर कैलास फड, माणिक फड आणि जयप्रकाश सोनवणे या तिघांची शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.


 






धनंजय मुंडेंना अभय


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपी हे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणाशी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केली होती. पण जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


पंकजा मुंडे यांनी घेतली अमित शाहांची भेट


पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यात मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. 


ही बातमी वाचा: