एक्स्प्लोर

वर्षभरापूर्वीच पुलाचं काम झाल्याचं दाखवत बिल उचचलं, सुरेश धसांच्या मतदारसंघातल्या कागदी पुलाचं बांधकाम बेमुदत आंदोलनानंतर अखेर सुरु

आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात केवळ कागदोपत्री पुलाचे काम दाखवून निधी लाटलेल्या, पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Beed: बीडच्या आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात केवळ कागदोपत्री पूल दाखवून दहा लाखांचा निधी लाटण्याचा प्रकार समोर आला होता.. दरम्यान ही बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती.  याची दखल घेत प्रशासनाने पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केलीय.. आष्टी तालुक्यातील तवलवाडी ते देवीगव्हाण या गावांना जोडणाऱ्या नदीवर दहा लाखांचा पूल मंजूर करण्यात आला. परंतु वर्षभरापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिल देखील उचलण्यात आले.. या पुलाची निर्मिती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.. तसेच राहुल जगताप या तरुणांने देखील बेमुदत उपोषण सुरू केले.. दरम्यान या सर्वाची दखल घेत प्रशासन कामाला लागले आहे.. (Suresh Dhas)

नेमकं प्रकरण काय?

केवळ कागदोपत्री पूल दाखवून निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला होता. आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील ही गंभीर बाब एबीपी माझाने प्रकाशझोतात आणली आणि अखेर प्रशासनाला जाग आली. ग्रामस्थांच्या संघर्षानंतर आणि माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. ही घटना आहे आष्टी तालुक्यातील तवलवाडी ते देवीगव्हाण या दोन गावांना जोडणाऱ्या नदीची. या ठिकाणी सुमारे दहा लाखांचा पूल मंजूर झाला होता. मात्र वर्षभरापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत अधिकाऱ्यांनी बिल उचलले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठलाही पूल नव्हता, त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात नदी पार करणे अवघड व्हायचे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.

ही बाब समोर आल्यानंतर तवलवाडीतील युवक राहुल जगताप याने थेट बेमुदत उपोषण सुरू केलं. एबीपी माझाने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनालाही दखल घ्यावी लागली. त्यानंतर अखेर प्रशासनाने हालचाल सुरू करत पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. सध्या त्या ठिकाणी मातीचा भर टाकण्याचं काम सुरू आहे. गावकऱ्यांनी आणि उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या या पावलंवर समाधान व्यक्त केलं आहे, मात्र काम पूर्ण होईपर्यंत लक्ष ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा

लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं

महत्त्वाच्या बातम्या

Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget