Beed News : असं म्हणतात की, जिथे हरीचे पारायण तिथे नगद नारायण. बीडमधील (Beed) नारायण गडावर असलेल्या नगद नारायण महाराजांच्या पादुका सुरळी गावात सुरू होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी थेट हेलिकॉप्टर (Helicopter) मधून आणण्यात आल्या होत्या. यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. याच आठवड्यात गहिनीनाथ गडावरून वामन भाऊच्या पादुका या हेलिकॉप्टरने आणण्यात आल्या होत्या. त्यामुळे आठवड्यात दोन वेळा हेलिकॉप्टरनं पादुका आणल्या गेल्या आहेत. 


बीड तालुक्यातल्या नारायण गडावर हेलिकॉप्टर नगद नारायण महाराज यांच्या पादुका त्यांच्या जन्म गावी घेऊन जाण्यासाठी मागवण्यात आलं होते. नगर नारायण महाराज यांचं जन्म गाव असलेल्या सुरळे गावात 71व्या नारळी सप्ताहाचा आयोजन करण्यात आला आहे आणि त्या निमित्ताने नगर नारायण महाराज यांच्या पादुका थेट हेलिकॉप्टरमधून सुरळे गावात पोहोचल्या आहेत. तर महादेव महाराजांनी या नारळी सप्ताहाची सुरुवात केली होती. दरवर्षी वेगवेगळ्या गावात या सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी सुरेगावमध्ये हा सप्ताह होतं आहे. त्यानिमित्त पादुका आणि गडाचे महंत यांना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. नारायण गडावरून सुरळे गावात येण्यासाठी या हेलिकॉप्टरला वीस मिनिटांचा वेळ लागला. 


पादुकांची भव्य अशी मिरवणूक 


विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ गडावरून देखील महाराजांच्या पादुका नेण्यासाठी अशाच एका हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. तर नारायणगडावर पुण्याहून बोलवलेल्या हेलिकॉप्टर साठी लाखो रुपयेचां खर्च भाविकांनी केले. भाविकांनी चक्क हेलिकॉप्टरमधून पादुका गावात आल्यानंतर या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं पूजन करण्यात आलं. 


श्रद्धेपोटी चक्क पादुका हेलिकॉप्टरने गावात आणले 


तर नारायण गडावरचे महादेव महाराज यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गावात हा सप्ताह व्हावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात. यावर्षीचा सप्ताह नगर नारायण महाराज यांच्या जन्म गावी होत असल्याने भाविकांनी त्यांच्या श्रद्धेपोटी चक्क हेलिकॉप्टरने त्यांच्या पादुका गावात आणल्या. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गड आहेत आणि या गडावर या पंचक्रोशीतील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळेच एका आठवड्यात दोन ठिकाणी पादुका घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर झाला.


महत्वाच्या इतर बातम्या :


Hanuman Jayanti 2023 : राज्यातील एकुलता एक 'निद्रिस्त अवस्थेतील मारुती'; मूर्तीबाबत आहे प्राचीन कथा