एक्स्प्लोर

Beed NCP Corporator : खोटा खापर पणजोबा उभा केला, माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा 'तो' खेळ फसला! पद रद्द होणार? नेमकं काय घडलं?

Beed NCP Corporator : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आता रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून यामुळे माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

माजलगाव (बीड): बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. माजलगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका रेखा सरोदे (माहेरचे नाव - रेखा अंकुश अंबुरे) यांचे 'मराठा कुणबी' जात प्रमाणपत्र जिल्हा जात (Beed NCP Corporator) पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. एवढेच नव्हे तर समितीने हे प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आता रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून यामुळे माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.(Beed NCP Corporator)

Beed NCP Corporator : सुमन मुंडेंच्या तक्रारीनंतर चौकशीचा ससेमिरा

नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मागास महिला प्रवर्ग आरक्षित जागेवर रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र खोटे आणि चुकीच्या पुराव्यांच्या आधारे मिळवले असल्याचा आक्षेप सुमन मुंडे यांनी घेतला होता. मुंडे यांनी यासंदर्भात थेट जिल्हा जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल करून पुराव्यांसह आव्हान दिले होते. या तक्रारीनंतर समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि कागदपत्रांची कसून पडताळणी केली.(Beed NCP Corporator)

Beed NCP Corporator : शालेय उताऱ्यावर 'कुणबी' नोंदच नव्हती!

जात पडताळणी समितीच्या चौकशीत रेखा सरोदे यांच्या जातीबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सरोदे यांच्या खळवट लिमगाव येथील मूळ शालेय उताऱ्याची (School Leaving Record) तपासणी केली असता, त्यावर केवळ 'हिंदू' किंवा 'हिंदू मराठा' अशी नोंद आढळून आली. संपूर्ण शालेय रेकॉर्डमध्ये कुठेही 'कुणबी' असा उल्लेख नव्हता.

Beed NCP Corporator : १५ किमी दूरच्या व्यक्तीला दाखवले 'खापर पंजोबा'

शालेय उताऱ्यावर कुणबी नोंद नसल्यामुळे रेखा सरोदे यांनी आपली कुणबी जात सिद्ध करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. त्यांनी त्यांच्या गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुप्पा गावचे रहिवासी 'यशवंत संभाजी' नावाच्या व्यक्तीला आपले 'खापर पंजोबा' दाखवले आणि त्यांच्या जुन्या कुणबी नोंदीचा गैरफायदा घेत स्वतःचा कुणबी दाखला पदरात पाडून घेतला.

Beed NCP Corporator : दुसऱ्या कुटुंबाच्या पुराव्यांची चोरी उघडी!

समितीने जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा उघड झाले की, यशवंत संभाजी हे प्रत्यक्षात तिथल्या स्थानिक 'सावंत' आडनावाच्या कुटुंबाचे पूर्वज आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याच यशवंत संभाजी यांच्या पुराव्यांच्या आधारावर पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांना आधीच जात वैधता प्रमाणपत्र (Validity) मिळालेले आहे. त्यामुळे सरोदे यांनी दुसऱ्याच कुटुंबाच्या पूर्वजांचा पूर्वग्रहदूषित वापर केल्याचे सिद्ध झाले.

Beed NCP Corporator : नगरसेवक पद जाणार?

शालेय रेकॉर्डमधील तफावत आणि चुकीच्या व्यक्तीला पूर्वज दाखवून मिळवलेला कुणबी दाखला यामुळे जिल्हा जात पडताळणी समितीने रेखा सरोदे यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून ते जप्त केले आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी मूळ जात प्रमाणपत्रच अवैध ठरल्याने, आता कायद्यानुसार रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या धक्क्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजलगावच्या स्थानिक राजकारणात कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget