एक्स्प्लोर

Ajit Pawar in Beed: डोक्यातलं जातीचं खूळ काढा, सगळी हाडामांसांची माणसं, सगळ्यांचं रक्त लालच आहे; अजित पवारांचं बीडमध्ये आवाहन

Beed News: अजित पवार यांनी बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच जिल्हाधिकाऱ्यांना विकास प्रकल्पांची सगळी माहिती तयार ठेवण्याचे आदेश दिले. पुढील चार तासांत मला सगळा तपशील द्या.

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आले आहेत. सकाळी अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगेच आपल्या कामाला आणि भेटीगाठींना सुरुवात केली. यावेळी काही लोक अजित पवार यांना भेटले. त्यांच्याशी बोलताना अजित पवार यांनी बीडमधील (Beed News) जनतेने डोक्यातून जातीचे खूळ काढले पाहिजे, असे आवाहन केले.

कुठंतरी मागे झालेल्या चुका आता टाळल्या पाहिजेत. आता आपल्याला नवीन पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोडं दम धरा, मी काय करतो ते बघा. बीडमध्ये अनेक गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा डोक्यातील जातीचं खूळ काढून टाका. सगळी हाडामासांची माणसं आहेत, सगळ्यांचं रक्त लालच आहे. परंतु, मी इथलं राजकारण गेली अनेक वर्षे बघतोय, जातीच्या मुद्द्यावरुन समाजात फूट पाडायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, हे सुरु आहे. इतक्या वर्षांमध्ये बीडला किती मंत्रीपदं आणि पदं मिळाली, पण विकास काय झाला, याचा विचार केला पाहिजे. मी महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही महापुरुषांविषयी माझ्या मनात श्रद्धेची, मानाची आणि आदराची भावना आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंच्या जागी मंत्री होण्यासाठी प्रकाश सोळंकेंची तयारी, म्हणाले....

अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना काही प्रश्न विचारले. धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित नसतात, याविषयी त्यांना विचारण्यात आले असता त्यांच्या चेहऱ्यावर सूचक हास्य उमटले. धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रिकामं झाले आहे, तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का? त्यावर प्रकाश सोळंके यांनी म्हटले की, का आवडणार नाही? कोणाला मंत्री व्हायला आवडत नाही, असे सोळंके यांनी म्हटले. 

बीडमध्ये अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

गेल्या नऊ दिवसांपासून बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी, शिक्षक आक्रमक झाले होते. या आंदोलकांनी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफ अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार यांनी आंदोलकांपैकी तीन जणांना पक्ष कार्यालयात निवेदन घेऊन बोलावून घेतले. त्यांच्या मागण्या सोडवण्यासारख्या असतील तर त्यांच्याशी बोलू, अशा सूचना अजितदादांनी पोलिसांना दिल्या.

आणखी वाचा

मिटींग सुरु झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही खपवून घेणार नाही, मला अप टू डेट माहिती हवेय; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget