बीड : राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघाताच्या (Accident) घटना घडत असतात, अनेकदा प्रवाशांना जीवही गमवावा लागतो. महामार्ग पोलीस यावेळी मदतीलाही येत असतात, पण अपघाताच्या दुघटनेत काहीवेळा कुटुंबातील कर्ता गमावतो, तर अनेकदा मोठा आर्थिक फटकाही बसतो. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी परिसरात दोनशे शेळ्या (Goat) घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या ट्रकमधील 170 शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस व स्थानिकांना यश आलं. मात्र, या शेळ्यांना सुखरुप बाहेर काढताना महामार्गावरील पोलीस कर्मचारी, हवालदार अन्सार मोमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत.
राजस्थानकडून 200 शेळ्या घेऊन हैदराबादकडे निघालेला ट्रकच्या डिझेल टाकीजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली होती. ट्रकचालकास याबाबत समजताच त्याने तात्काळ ट्रक थांबवून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण ट्रकला भीषण आग लागली, आगीत ट्रक पेटल्याने सगळीकडे हाहाकार उडाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलीस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या ट्रकमध्ये असलेल्या शेळ्या बाहेर काढण्यासाठी सर्वांची जीवाची बाजी लावली. आग लागलेल्या ट्रकमधून शेळ्यांना सुखरुपणे बाहेर काढताना या सर्वांची दमछाक झाली. मात्र, तब्बल 170 शेळ्यांना घेऊन सुखरुप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने 30 शेळ्यांचा भीषण आगाती होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, या ट्रकमधून तब्बल 200 शेळ्या हैदराबादला नेण्यात येत होत्या. ट्रकला आग लागल्यानंतर शेळ्यांचा जीव वाचवताना या बचाव कार्यामध्ये पोलीस हवालदार अन्सार मोमीन किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा
अरे महादेव त्रिशुळ घालून देईन...; बच्चू कडूंची जीभ घसरली, आमदार संतोष बांगरांवर प्रहार