MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024, म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर झाला आहे.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करत शिवसेना शिंदेंचीच असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यामुळे बालाजी किणीकर पात्र ठरले आहेत.
आज उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या 14 आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर पडदा उठणार आहे. यातच शिंदे गटाचे अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. या निकालात ठाकरे गटाचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) पात्र होणार की अपात्र? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
सलग तीन वेळेस आमदार (MLA BALAJI KINIKAR)
बालाजी किणीकर यांनी ठाण्यातील अंबरनाथ मतदारसंघातून निवडणुक लढवत विधानसभा गाठली. किणीकर यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी 2009 आणि 2004 ला देखील ते आमदार म्हणून निवडूण आले होते. दरम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर किणीकर यांनी त्यांनाच साथ दिली. एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी ते गुवाहाटीत देखील दाखल झाले होते.
एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी गुवाहाटी गाठली (MLA BALAJI KINIKAR)
तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आले असतानाही बालाजी किणीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी गुवाहाटी देखील गाठली होती. बालाजी किणीकर हे शिवसेनत सक्रिय आहेत. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्यावर काही राजकीय गुन्हे दाखल करण्यात आले. उल्हासनगरमध्ये पाण्याची समस्या होती. त्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंत्याविरोधात मोर्चा काढला. शासकीय कार्यालयाची तोडफोड केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल झाला.
जीवे मारण्याच्या धमक्या (MLA BALAJI KINIKAR)
शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांना जून 2022 मध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या होत्या. ठाण्यातील अंबरनाथ येथील कार्यालयात किणीकर यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. शिवाय, अंबरनाथमध्ये किणीकर यांचा 'विश्वासघाती' असा उल्लेख करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली होती. दरम्यान, आता बालाजी किणीकर यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पात्र ठरवतात की अपात्र? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या