Shiv Sena MLA Disqualification Case : प्रकाश सुर्वे मागाठाणे मतदारसंघातून  निवडून येत विधानसभेत पोहोचले होते. आज त्यांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) घेतला आहे . प्रकाश सुर्वे यांच्यासह शिंदे गटाचे  सर्व आमदार पात्र ठरले आहेत. 


कोण आहेत प्रकाश सुर्वे 


प्रकाश सुर्वे मूळचे शिवसैनिक नव्हते. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)कार्यरत होते. राष्ट्रवादीत (NCP) असताना उत्तर मुंबईची जबाबदारी होती. 2009 मध्ये त्यांनी मागाठाणे मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. दरम्यान, 2009 मध्ये मनसेच्या 13 जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी मनसेचे उमेदवार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी प्रकाश सुर्वेंचा पराभव केला होता. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये प्रकाश सर्वे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये प्रविण दरेकर, हेमेंद्र मेहता, सचिन सावंत यांच्या सारख्या दिग्गजांना मागे सारत प्रकाश सुर्वेंनी विधानसभेची निवडणुक जिंकली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सुर्वे यांनी मनसेच्या नयन कदम यांचा तब्बल 49 हजार मतांनी पराभव केला. 


व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत 


शिवसेनेत बंड झाल्यानंतर प्रकाश सुर्वे मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) यांच्यासोबत गेले. गुवाहाटीवरुन परत आल्यानंतर मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांना आणत शक्तीप्रदर्शन केले. गुवाहाटीत गेल्यानंतर त्यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले होते. मतदारसंघातील लोकांचा रोष कमी करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा देखील घेतली होती. शिवाय, बोरीवली येथील एका पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला सुर्वे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना बोलवले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांचा जीपमधील  एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 



आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी होते


मागाठाणे मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानले जायचे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते गुवाहाटीत दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारसंघात बोलावून त्यांनी मोठी सभा देखील घेतली. गुवाहाटीतून विधानसभेत परतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेसोबत का गेले? असा जाबही विचारला होता. त्यावेळी त्यांना आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते. दरम्यान, आज त्यांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) घेणार आहेत. प्रकाश सुर्वे पात्र ठरणार की अपात्र? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Potnis : उद्धव ठाकरेंची साथ न सोडणारे संजय पोतनीस; पात्र की अपात्र? अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष