Shiv Sena MLA Disqualification Case Verdict : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज ऐतिहासिक निकाल येईल. या निकालाने राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात अंतिम निकाल देणार आहेत. त्याआधी ठाकरे गट आक्रमक झालाय. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार निकाल दिला तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. पण ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख पात्र ठरणार की अपात्र याची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नितीन देशमुख सुरतला गेले होते. गुवाहाटीला जाताना त्यांनी तेथून पलायन केले  अन् थेट मुंबई गाठली. नितीन देशमुख सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आज ते पात्र ठरणार की अपात्र याबाबतचा निर्यण आला असून ते पात्र ठरले आहे. 


नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षफुटीनंतर सुरतला गेले होते. त्यानंतर गुहावटीला जात असताना त्यांनी पलायन केलं आणि उद्धव ठाकरेंना समर्थन दिले. ते सध्या ठाकरे गटासोबत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले त्यावेळी बाळापुरचे आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. नितीन देशमुख यांनी सूरतवरुन मुंबईत परत येण्याचा थरार सांगितला होता. सूरतमध्ये पोलिसांचा कसा बंदोबस्त होता, याचंही वर्णन केले होते. सत्तासंघर्षावेळी नितीन देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. 


रुग्णालयात उपचार, अन् आरोप प्रत्यारोप - 


बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितिन देशमुख एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले होते. त्यावेळी त्यांना हा मोठा कट असल्याचं समजलं. त्यावेळी  तिथे त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गंभीर अवस्थेत  सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. एकनाथ शिंदेंवर त्यावेळी नितीन देशमुख यांनी अनेक आरोप केले होते.    तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं, असा आरोप नितीन देशमुख यांना केला. 


राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करण्याची मागणी - 


विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली.  ते म्हणाले की, सत्तासंघर्षाचा निकाल आधीच ठरलेला. भाजपनं सांगितला तसा विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास. आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. निकाल देणारे न्यायाधीश नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे.


नितीन देशमुख यांचा राजकीय प्रवास- 


नितीन भिकनराव ताले (देशमुख) 
मूळगाव : सस्ती, ता : पातूर, जि. - अकोला. 
1998 ते 2003 आणि 2003 ते 2008 सदस्य पातूर पंचायत समिती. 
2005 ते 2008 उपसभापती पातूर पंचायत समिती. 
2008 मध्ये अपक्ष म्हणून अकोला जिल्हा परिषदेवर सस्ती मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी. 
2008 ते 2010 अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकरांच्या सोबतीने जिल्हा परिषदेत सत्तेत. कृषी सभापतीपदी अडीच वर्ष निवड. 
2013 मध्ये दुसर्यांदा अकोला जिल्हा परिषदेवर चोंढी मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी. 
2018 मध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. निवडणुकीत पराभूत. 
2018 मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून निवड. त्याआधी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख म्ह़णून काम. 
2019 मध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवड. 
जून 2021 मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातून परत ठाकरे गटात. गुवाहाटीवरून परत आलेत.


2019 च्या निवडणुकीत काय झालं ?
नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या हरिभाऊ पुंडकर यांचा पराभव केला होता. सध्या ते ठाकरे गटासोबत आहेत.