Year End Discount on Cars: लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी होंडा (Honda) त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारवर बंपर ऑफर देत आहे. होंडा आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन कार्स लाँच करत असते. यावेळी कंपनी त्यांच्या 3 लोकप्रिय गाड्यांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. वर्षअखेरीस होंडा कार उत्पादक कंपनी ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. एक्स्चेंज बोनस, एक्स्चेंज आणि कॉर्पोरेट आदी गोष्टी या ऑफरमध्ये समाविष्ट असणार आहेत. कंपनी नेमक्या कोणत्या गाड्यांवर सूट देत आहे हे जाणून घेऊया.


होंडा सिटी (Honda City)


कंपनी त्यांच्या सर्वाधिक मागणी असलेल्या होंडा सिटी कारवर 88,600 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध आहे. 25 हजार रुपयांची रोख ऑफरसह किंवा 26,957 रुपये किमतीच्या ॲक्सेसरीजची निवड; 15 हजार रुपये कार एक्स्चेंज बोनस, 4 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 6 हजार रुपये होंडा कार एक्स्चेंज स्कीम या सवलती ठरवण्यात आल्या आहेत. यात दोन कॉर्पोरेट सवलती आहेत ; 20 हजार रुपयांचा विशेष करार आणि 5 हजार रुपये. (VX) आणि (ZX) 13,651 रुपयांच्या पाच वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, एलिगंट एडिशन व्हेरियंटमध्ये दोन ऑफर आहेत ; 10 हजार रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 40 हजार रुपयांचा स्पेशल एडिशन बेनिफिट. होंडा सिटी सेडान कारची किंमत 11.63 लाख ते 16.11 लाख रुपयांदरम्यान आहे.


होंडा सिटी e:HEV (Honda City e:HEV)


होंडा सिटी e:HEV ही गाडी डिसेंबरपर्यंत मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. जुनं वाहन एक्स्चेंज करणाऱ्या गाडीच्या मालकांसाठी थेट रुपये एक लाखांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. सध्या ही गाडी दोन ट्रीममध्ये V and ZX Sensing मध्ये उपलब्ध आहे; व्हीची (V) किंमत 18.89 लाख रुपये आणि ZX सेन्सिंग 20.39 लाख रुपयांना आहे.


होंडा अमेझ (Honda Amaze)


होंडा अमेझवर (Honda Amaze) डिसेंबरमध्ये 77 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊटं दिला जात आहे. यातील एस (S) व्हेरिएंट 35 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 42,444 रुपये किमतीच्या ॲक्सेसरीज, 15 हजार रुपयांचे एक्स्चेंज बोनस; 20 हजार रुपयांची विशेष कॉर्पोरेट सूट आणि 4 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आहे. तर दुसरीकडे Amaze VX व्हेरिएंटमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा 30,245 रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीजची; 15 हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस, 20 हजार रुपयांची विशेष कॉर्पोरेट सूट, 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट, 4 हजार रुपये बोनस डिस्काऊंट मिळत आहे. Amaze ची किंमत 7.10 लाख रुपये ते 9.86 लाख रुपयांपर्यंत आहे.


हेही वाचा:


Cars Price Hike in 2024 : जानेवारी 2024 पासून 'या' कंपन्यांच्या गाड्या महागणार; मारुती सुझुकीपासून BMW पर्यंत 'या' गाड्यांचा यादीत समावेश


Car loan Information:

Calculate Car Loan EMI