मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय प्रीमियम कार निर्माता कंपनी कियाने आता दुसऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या आपल्या आविष्काराचा नवा अवतार'द न्यू सोनेट' सादर केला आहे. ही कार सर्वात आधी भारतीय बाजारपेठेत उतरवली जात आहे. तंत्रज्ञानस्नेही आणि एकाच ठिकाणी सर्व वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या वाहनांच्या शोधात असलेली आधुनिक जोडपी तसेच व्यावसायिकांना लक्षात घेऊन ही सर्वात भारदस्त आणि स्पोर्टीअर नवी सोनेट डिझाइन करण्यात आली आहे.


या कारमध्ये 10 स्वायत्त फीचर्ससह एडीएएस , पुढील भागात धडक होऊ नये म्हणून मदत करणारी यंत्रणा - फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट आणि एकाच लेनमध्ये राहण्यासाठी सहाय्यकारी - लेन फॉलोइंग असिस्ट  या वैशिष्ट्यांचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. मजबूत १५ हायसेफ्टी फीचर्सच्या अंतर्भावासोबतच सोनेट आता २५ पेक्षा सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसोबत येते. या श्रेणीत १५ स्टँडर्ड सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसह येणारी नवी सोनेट ही एकमेव कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. इतकेच नव्हे तर, नव्या सोनेटमध्ये या श्रेणीतील 10  सर्वोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाइन, मागील दारावरील सनशेड कर्टन सर्वच दरवाजांत पॉवर विंडो आहेत, त्याही सुरक्षेसह वन टच ऑटो अप-डाऊनसह. आणि आणखी काही वैशिष्ट्यांचे नाव घ्यायचे म्हटले तर नव्या सोनेटमध्ये विषाणू आणि जीवाणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहे.


कॅरेन्स आणि श्रेणीत प्रथम सेल्टोसमध्ये या उद्योगातील पहिल्याच ६ स्टँडर्ड एअरबॅग्ज सादर करण्याचा बहुमान पटकावल्यानंतर किया सुरक्षात्मक मापदंडांना पुन्हा नव्याने पारिभाषित करत आहे. एक मानक वैशिष्ट्य म्हणून ६ एअरबॅग्ज देत नव्या सोनेटने कियाचे स्थान आणखीच भरभक्कम केले आहे, जो आपल्या सर्व वाहनांमध्ये ६ ते ८ एअरबॅग्ज देणारा सर्वात युवा ब्रँड ठरल आहे.


फिचर कोणते? 


५ एमटी इन एचटीई, एचटीके आणि एचटीके+ आवृत्त्यांत स्मार्टस्ट्रीम जी१.२ इंजिनसोबत


 सर्व डिझेल आवृत्त्यांत ६ एमटी


पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही आवृत्त्यांत ६आय एमटी


पेट्रोल आवृत्त्यांत ७ डीसीटी, आणि


डिझेल आवृत्त्यांत ६ एटी


नवी सोनेट – मूल्यासोबत श्रेष्ठतम सुविधा : प्रमुख वैशिष्ट्ये 


सुरक्षा  -  २५ वैशिष्ट्ये:


नवी सोनेट १० स्वायत्त गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे ती सर्वात सुरक्षित आणि सुविधाजनक कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारपैकी एक ठरते.



१. फ्रंट कोल्यूजन वॉर्निंग


२. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट पेडस्टेरियन


३. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट सायकलिस्ट


४. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट कार


५. लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट


६. लेन डिपार्चर वॉर्निंग


७. लेन कीप असिस्ट


८. लेन फॉलोइंग असिस्ट


९. हाय बीम असिस्ट


१०. ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग


मजबूत १५ स्टँडर्ड सुरक्षात्मक पॅकेज (सर्व आवृत्त्यांतील किमान मापदंड) 


१. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)


२. व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (व्हीएसएम)


३. हिल-स्टार्ट कंट्रोल (एचएसी)


४. फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज


५. फ्रंट सीट साइड एअरबॅग्ज


६. साइड कर्टन एअरबॅग्ज


७. अँटी-लॉक ब्रेक सिस्टिम (एबीएस)


८. ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टिम (बीएएस)


९. रिअर पार्किंग सेन्सर्स


१०. इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस)


११. हायलाइन टायर प्रेशर मॉनिटर


१२. 1स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक


१३. इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक


१४. 3-पॉइंट सीटबेल्ट्स (फ्रंट अँड रिअर ऑल सीट्स)


१५. सीट बेल्ट रिमाइंडर (फ्रंट अँड रिअर ऑल सीट्स)


एक्स्टेरिअर : सोनेटला बेधडक आणि भारदस्तपणा दाखवण्यासाठी स्पोर्टी आणि अपराइट डिझाइनद्वारे तयार करण्यात आले आहे.


नव्या सोनेटमध्ये करण्यात आलेल्या प्रमुख बदलांपैकी पुढीलप्रमाणे :


१. क्राऊन ज्वेल एलईडी हेडलॅम्प्स


२. स्टार मॅप एलईडी डीआरएल्स


३. स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्स


४.  स्लीक एलईडी फॉग लॅम्प्स् (जीटीएक्स+/एक्स लाइन) आणि आइस क्यूब एलईडी फॉग लॅम्प्स (एचटीके+, एचटीएक्स आणि एचटीएक्स+)


५. स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्स


६. स्पोर्टी एअरोडायनामिक स्किड प्लेट्स


७. आर १६ क्रिस्टल कट अलॉय व्हील्स


८. बॉडी कलर रिअर स्पॉयलर (जीटीएक्स+/एक्स - लाइन)


९. न्यू बम्पर डिझाइन


१०. ८ मोनोटोन, २ ड्युअल टोन आणि १ मॅट फिनिश कलर


११. नवीन प्यूटर ऑलिव्ह बॉडी कलरचा समावेश


इंटेरिअर : एक आरामदायी आणि आलिशान केबिनचा अनुभव


आपल्या तंत्रज्ञानाभिमुख डॅशबोर्डच्या माध्यमातून नव्या सोनेटचे इंटेरिअर्स इन-केबिन अनुभवाची नव्याने व्याख्या करायला भाग पाडतात. यात अनेक सुविधाजनक वैशिष्ट्ये आणि आलिशान उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे :


१. द एलईडी अॅम्बिएंट साऊंड लायटिंग


२. बोस प्रीमियम ७ स्पीकर सिस्टिम, जेणेकरून आपल्यासोबतच्या लोकांसोबत प्रवासाचा अनुभव आणखीच मजेदार होईल. 


३. ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाइन फुल क्लस्टर विथ २६.०४ सेमी (१०.२५”)  कलर एलसीडी एमआयडी आणि २६.०३ सेमी (१०.२५”) एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन


४. ६०:४० सीटबॅक स्प्लिट फोल्ड सीट्स


५. स्टिअरिंग व्हीलवर नवीन जीटी लाइन लोगो


६. ५ इंटेरिअर कॅलर पर्यायांसह एक नवीन कलर


a. ऑल ब्लॅक


b. ब्लॅक अँड बेइज ड्युअल टोन 


c. ऑल ब्लॅक इंटेरिअर विथ प्रीमियम ब्राऊन इन्सर्ट्स (नवीन कलर)


d. ऑल ब्लॅक इंटेरिअर विथ स्पोर्टी व्हाइट इन्सर्ट्स


e. ऑल ब्लॅक इंटेरिअर आणि एक्सक्लुझिव्ह सेज ग्रीन इन्सर्ट्स


सुविधादायी फीचर्स : 


१. ३६० डिग्री कॅमेरा विथ ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर इन क्लस्टर


२. ४-वे पॉवर ड्रायव्हर्स सीट



किया कनेक्ट : 


२०२० मध्ये बाजारपेठेत सादर केल्यानंतर ५० पेक्षा अधिक कनेक्टेड कार फीचर्स देत या श्रेणीत सोनेटने एक मैलाचा दगड रोवला होता. ग्राहकांचा प्राधान्यक्रम आणि बाजारपेठेतील मागणीशी सुसंगती दाखवत कियामध्ये ७० पेक्षा जास्त कार कनेक्टेड फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे ५ मुख्य आधारस्तंभ आहेत – सुरक्षा आणि सुरक्षितता, सहजता, रिमोट कंट्रोल, नेव्हिगेशन आणि व्हेइकल मॅनेजमेंट. कारसोबत ग्राहकांना कनेक्ट करून हे फीचर्स केवळ सुविधाच देत नाहीत तर विविध पैलूंच्या दृष्टीने वाहन आणि त्याती बसलेल्यांची सुरक्षाही मजबूत करतात. सोनेटमधील प्रमुख कनेक्टेड कार फीचर्समध्ये प्रामुख्याने : 


१. फाइंड माय कार विथ सराउंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम)


२. हिंग्लिश व्हीआर कमांड्स


३. व्हॅलेट मोड


४. रिमोट विंडो कंट्रोल


५. एअर प्युरिफायर कंट्रोल


६. अॅडव्हान्स्ड ऑटो कोल्यूजन नोटिफिकेशन (एएसीएन)


७. स्टोलन व्हेइकल नोटिफिकेशन


८. रिमोट लाइट ओन्ली


Car loan Information:

Calculate Car Loan EMI