Yamaha Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा लवकरच एक नवीन बाईक लॉन्च करू शकते. कंपनी आपली Yamaha MT-15 V2.0 बाईक अपडेट करून लॉन्च करू शकते. ही बाईक 1 एप्रिलपासून लागू होणार्‍या नवीन उत्सर्जन मानकांशी जुळणारी पहिली बाईक असेल. देशांतर्गत दुचाकी बाजारात यामाहा बाईकची थेट स्पर्धा Suzuki Gixxer SF आणि KTM RC 125 शी आहे. यामाहाची ही अपकमिंग बाईक संध्यच्या मॉडेलसारखीच दिसायला दमदार असू शकते, यात कंपनी अनेक नवीन अपडेटेड फीचर्स देऊ शकते. कंपनी आपली ही नवीन बाईक कधी लॉन्च करणार? या बाईकची बाजारात लॉन्च केल्यानंतर किंमत किती असू शकते, याबाबत अधिक माहिती अजनून घेऊ...


Yamaha MT-15 V2.0  बाईक नवीन अपडेटसह येईल


ही नवीन अपडेटेड यामाहा बाईक Yamaha MT-15 V2.0 स्पोर्टी नेकेड स्टाईलमध्ये सादर केली जाईल. तसेच ही बाईक 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या नवीन उत्सर्जन नियमांनुसार बनवलेली देशातील पहिली बाईक असेल.


नवीन Yamaha MT-15 V2.0 बाईक इंजिन


यामाहा 155cc VVA लिक्विड कूल्ड इंजिन या नवीन Yamaha MT-15 V2.0 बाईकमध्ये दिले जाऊ शकते, जे या बाईकला 18hp पॉवर आणि 14Nm टॉर्क देण्यास सक्षम असेल.


नवीन Yamaha MT-15 V2.0 बाईक लूक


मिळालेल्या माहितीनुसार, याच्या डिझाइनमध्ये फारसा बदल न करता जवळपास सारख्याच अॅक्सेसरीज ठेवल्या जातील. ज्यामध्ये फ्रंट सस्पेन्शन फोर्क आणि मागील मोनोशॉकसह दोन्ही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक देखील असतील. हे सिंगल व्हेरिएंट आणि एकाधिक रंग पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते.


नवीन Yamaha MT-15 V2.0 बाईकची किंमत


यामाहा या अपडेटेड बाईकच्या किमतीत 3000 ते 5000 रुपयांची वाढ करू शकते. यामाहा या बाईकचे सध्याचे मॉडेल 1,64,400 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत विकत आहे.


स्पर्धा


यामाहाने आपल्या या बाकीच्या लॉन्चच्या तारखेबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. देशांतर्गत दुचाकी बाजारात यामाहा बाईकची थेट स्पर्धा Suzuki Gixxer SF आणि KTM RC 125 शी आहे.


नवीन उत्सर्जन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील


देशातील वाढत्या प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता सरकार वाहन उत्पादक कंपन्यांसाठी काही कठोर नियम लागू करणार आहे, जे 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक त्यांच्या वाहनांच्या इंजिनमध्ये बदल करत आहेत.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Bugatti Chiron Sport Car: बुगाटीने आपल्या शेवटच्या पेट्रोल कारचा केला लिलाव, तब्बल इतक्या कोटींना कार विकून केला विश्वविक्रम


Car loan Information:

Calculate Car Loan EMI