Top Selling SUV : सध्या, SUV कार ही देशातील बहुतांश ग्राहकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या या  SUV वरअधिक लक्षकेंद्रीत करत आहेत. त्यामुळे बाजारात SUV कारच्या ऑप्शन्सची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्याचा कारच्या विक्रीचा अहवाल समोर आला आहे. या एकंदरीत विक्री झालेल्या अहवालानुसार, फक्त टाटा (Tata), ह्युंदाई (Hyundai) आणि मारुतीची SUV या कारचा टॉप 10 म्हणजेच सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश झाला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीला विक्रीच्या बाबतीत  मागे टाकले आहे. 


Tata Nexon ने 15,567 युनिट्स विकल्या


गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये, टाटाने नेक्सॉन या एसयूव्ही सेगमेंट कारच्या 15,567 युनिट्स विकल्या. गेल्या वर्षी याच वेळी टाटाने नेक्सॉनच्या 13,816 युनिट्सची विक्री केली होती. याचाच अर्थ टाटा नेक्सॉनच्या विक्रीत तब्बल दोन हजाराने वाढ झाली आहे. जर Hyundai Creta बद्दल बोलायचे झाल्यास, मागील महिन्यात Hyundai या कारचे 15,037 युनिट्स विकण्यात यशस्वी ठरली आहे. मागील वर्षी याच महिन्यात Hyundai ने या कारच्या 9,869 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच, Hyundai ने यावेळी या कारचे 5,168 अधिक युनिट्स विकले. त्याच वेळी, सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही कार तिसऱ्या क्रमांकावर मारुती ब्रेझा होती. गेल्या महिन्यात मारुतीने या कारच्या 14,359 युनिट्सची विक्री केली. तर जानेवारी 2022 मध्ये या कारचे 9576 युनिट्स विकले गेले.


टाटा नेक्सॉन सुरक्षित आहे?


Tata Nexon ला ग्लोबल क्रॅश टेस्ट (NCAP) द्वारे 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. यामुळे ही कार सुरक्षित कारच्या यादीत समाविष्ट झाली आहे. दुसरीकडे, या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा या कारमध्ये 1.2 L टर्बो पेट्रोल इंजिन देते, जे 118bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. त्याच वेळी, त्याच्या डिझेल पर्यायामध्ये, कंपनी 1.5 L डिझेल इंजिन ऑफर करते, जे 108bhp ची कमाल पॉवर देते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल (MT) आणि ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सेसशी जोडलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा लवकरच नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. टाटा नेक्सॉनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Bugatti Chiron Sport Car: बुगाटीने आपल्या शेवटच्या पेट्रोल कारचा केला लिलाव, तब्बल इतक्या कोटींना कार विकून केला विश्वविक्रम


Car loan Information:

Calculate Car Loan EMI