TVS iQube vs Hero Vida V1: देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच अनेक वाहन उत्पादक आपले नवनवीन इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरवत आहेत. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यातच जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे आम्ही दोन पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube आणि Hero Vida V1 ची तुलना करणार आहोत. जेणेकरून तुम्ही अधिक चांगला पर्याय निवडू शकता. चला तर जाणून घेऊ दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणती आहे बेस्ट...


TVS iQube vs Hero Vida V1: किंमतीतील फरक 


जर आपण TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटर iQube च्या किंमतीबद्दल बोललो तर कंपनीने याची प्रारंभिक किंमत 1.61 लाख रुपये ठेवली आहे. Hero MotoCorp आपली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 ची प्रारंभिक किंमत 1.28 लाख रुपये ठेवली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.39 लाख रुपये आहे. जर आपण दोन्ही स्कूटरच्या किंमतींवर नजर टाकली तर, Hero Vida V1 त्याच्या प्रतिस्पर्धी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube पेक्षा सुमारे 33 हजार रुपये कमी किमतीत उपलब्ध आहे.


TVS iQube vs Hero Vida V1: बॅट्रीक पॅक


बॅटरी पॅकच्या बाबतीत TVS त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर iCube मध्ये 4.56 kWh क्षमतेसह लिथियम-आयन बॅटरी पॅक ऑफर करते. ज्यामध्ये 4400W पॉवर BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडली गेली आहे. ही पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तास 6 मिनिटे लागतात. तसेच Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.94 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यामध्ये 6000W पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर जोडली गेली आहे. TVS iQube बॅटरीच्या बाबतीत Hero Vida च्या पुढे आहे, पण Hero Vida V1 मध्ये दिलेली मोटरमध्ये जास्त पॉवर आहे.


TVS iQube vs Hero Vida V1: रेंज 


टीव्हीएसने iQube इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज केल्यावर 145 किमीची रेंज देते, असा कंपनीने दावा केला आहे. या सोबतच ही 82 किमी/ताशी हाय स्पीडने धावते. दुसरीकडे Hero MotoCorp, Hero Vida V1 साठी पूर्ण चार्ज केल्यावर 165 किमी रेंज देते देत असल्याचा दावा करण्यात येत असून ही 80 किमी/ताशी हाय स्पीडने धावते. TVS मोटर्स आणि Hero MotoCorp च्या दाव्यानुसार, Hero Vida V1 एका चार्जवर TVS iQube पेक्षा 15 किमी जास्त धावण्यास सक्षम आहे.


TVS iQube vs Hero Vida V1: ब्रेकिंग सिस्टम


ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाल्यास, TVS ला त्याच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागील चाकावर डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेकसह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम मिळते. तसेच Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची ब्रेकिंग सिस्टीम सारखीच आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI