Yamaha Crosser 150: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha ने आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक Crosser 150 लॉन्च केली आहे. यामाहाने ही बाईक ब्राझीलमध्ये लोकनह केली आहे. कंपनी लवकरच ही बाईक भारतात ही लॉंच करू शकते. भारतात याची स्पर्धा Hero XPulse 200 शी होणार आहे. कंपनीने आपल्या या नवीन बाईकमध्ये अनेक आधुनिक अपडेट्स दिले आहेत. 


नव्याने अपडेट केलेल्या यामाहा क्रॉसर 150 अॅडव्हेंचर बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सर्व-नवीन एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. बाईकमध्ये नवीन चार्जिंग सॉकेट देखील देण्यात आले आहे, जेणेकरून वापरकर्त्याला ही बाईक चालवताना इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करताना त्रास होऊ नये. यात सिंगल-चॅनल एबीएस देखील ग्राहकांना मिळेल आणि दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क ब्रेक उपलब्ध असतील.


इथेनॉलवरही चालणार बाईक 


या बाईकमध्ये 149cc 2-वाल्व्ह इंजिन आहे, जे 12.2bhp पॉवर आणि 12.74Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन देण्यात आले आहे. एक गोष्ट जी याला विशेष बनवते ती म्हणजे ही बाईक पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीद्वारे चालवली जाऊ शकते. इथेनॉलवर चालवल्यावर ही बाईक अधिक ऊर्जा निर्माण करते.


किंमत


अपडेट Yamaha Crosser 150 Adventure च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक 16,590 डॉलर इतक्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते. जी भारतीय चलनात सुमारे 2,69,477 रुपये आहे. ही बाईकची प्रारंभिक किंमत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI