Worlds First Flying Bike: ज्या बाईक आतापर्यंत रस्त्यावर धावत होत्या, त्या लवकरच तुम्हाला आकाशात उडताना दिसणार आहेत. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकमध्ये 8 पॉवरफुल जेट इंजिन वापरण्यात आले आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सामना करत जर तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर तुम्हाला किमान 2 तास लागतील. मात्र या बाईकने तुम्ही फक्त 30 मिनिटात मुंबईहून (Mumbai) 83 किलोमीटर लांब असलेल्या लोणावळ्याला पोहचू शकता. या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किमीचा प्रवास करण्याची क्षमता आहे. याबाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..


Worlds First Flying Bike: डिझाइन


याच्या मूळ डिझाइनमध्ये चार जेट इंजिने वापरली गेली होती, तर आठ जेट इंजिन त्याच्या फायनल डिझाइनमध्ये दिसतील. म्हणजे चारही कोपऱ्यांवर दोन जेट इंजिन वापरले जातील. जे रायडरला संरक्षण देण्यास सक्षम असेल. ही बाईक 136 किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम असेल.


Worlds First Flying Bike: 400 किलोमीटर/तास पेक्षा जास्त असेल वेग 


हवेतून उडणारी ही बाईक 250mph (400 km/h) वेगाने हवेत उडण्यास सक्षम असेल.
व्हिडीओ गेमसारखा असेल कंट्रोल सिस्टीम


ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित केले जाते. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे. तर दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड वाढवण्याचे आहे.


Worlds First Flying Bike: किंमत  


या बाईकचे निर्माते जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने याची प्रारंभिक किंमत 3.15 कोटी रुपये ठेवली आहे. ही बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.

Worlds First Flying Bike: जानेवारीत येतेय फ्लाइंग कार 


यावर्षी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो आयोजित केला जाणार आहे. वाहन उत्पादक कंपनी Aska आपली ही कार (Electric Flying Car) सादर करणार आहे. ही 4 सीटर कार असेल. याला इलेक्ट्रिक टेक-ऑफ आणि लँडिंग म्हणजेच eVTOL वाहन 5 ते 8 जानेवारी दरम्यान CSE 2023 मध्ये प्रदर्शित केले जाईल. याची फ्लाइंग रेंज 400 किमी पर्यंत असू शकते आणि याची टॉप फ्लाइंग स्पीड (Electric Flying Car) ताशी 240 किमी पर्यंत असणे अपेक्षित आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI