Sedan Cars in India: जर तुम्ही या नवीन वर्षात बजेट सेडान कार घरी आणण्याचा विचार करत असाल. तर आज आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या 4 बेस्ट पर्यायांची माहिती देणार आहोत. ज्याचा तुम्ही विचार करू शकता. चाल तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स...


Hyundai Aura : ह्युंदाई ऑरा


बजेट सेडान कारमध्ये पहिला क्रमांक ह्युंदाई ऑरा सेडान कारचा आहे. ज्याची किंमत 6.09 लाख रुपये ते 8.87 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याच्या फीचर्स बद्दल बोलायचे तर, यात वायरलेस फोन चार्जर, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एअर कंडिशनर, क्रूझ कंट्रोल यासारख्या फीचर्ससह 402 एल बूट स्पेस देखील आहे. याच्या पॉवर ट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यातील इंजिन 1.2-L पेट्रोल इंजिन आहे. जे 83 PS ची शक्ती आणि 114 NM चा पीक टॉर्क जनरेट करते. यात दुसरे 1L टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन, जे 100 PS पॉवर आणि 172 NM पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनांना 5 स्पीड एमटी आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. ही सेडान कार 20.1 kmpl पर्यंत मायलेज देते.


Tata Tigor : टाटा टिगोर


टाटाची टाटा टिगोर सेडान कार सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जी 6.10 लाख ते 8.84 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीच्या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. याला 419 L ची बूट स्पेस मिळते. रेन सेन्सिंग वायपर्सपासून स्टार्ट-स्टॉप बटण पुश करण्यापर्यंत, कीलेस एंट्री, अँड्रॉइड ऑटोसह ऑटो एसी आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्स यात मिळतात. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे 1.2 L पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 86 PS पॉवर आणि 113 NM पीक टॉर्क जनरेट करते. ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने 19.27 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.


Honda Amaze : होंडा अमेझ


बजेट सेडानच्या यादीत चौथ्या क्रमांकावर Honda ची Honda Amaze सेडान कार आहे. जी 6.63 लाख ते Rs 11.50 लाख एक्स-शोरूमच्या किमतीत तीन ट्रिमसह उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला 480L बूट स्पेस मिळेल. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5 स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्ससह 1.2 L पेट्रोल आणि 1.5 L डिझेल इंजिन दोन्ही पर्याय आहेत. ही कार पेट्रोल इंजिनवर 18.6 kmpl आणि डिझेलवर 24.7 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.


Maruti Dzire : मारुती डिझायर


मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार तिसऱ्या क्रमांकावर मारुती डिझायर आहे. जी 6.24 लाख ते 9.18 लाख रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. ही सेडान कार 378 लीटरच्या बूट स्पेससह चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात क्रूझ कंट्रोल, ऑटो फोल्डिंग ORVM, पुश बटण इंजिन स्टार्ट स्टॉप, ऑटो एसी, Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह उपलब्ध आहेत. कारमध्ये 1.2 एल ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 90 पीएस पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जे 5 स्पीड स्टँडर्ड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कार पेट्रोलवर 22.61 kmpl आणि CNG वर 31.12 kmpkg मायलेज देते.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI