Women's Day 2024 : यंदाच्‍या महिला दिनानिमित्त (Women's Day) तुमच्‍या जीवनातील महिलांना मुक्‍तपणे प्रवास करता येण्‍यासाठी बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्स (Electric Scooter) गिफ्ट द्या. आई, पत्‍नी किंवा कोणतीही प्रभावशाली महिला असो इलेक्ट्रिक स्‍कूटर्स पर्यावरणास अनुकूल परिवहन सोल्‍यूशन्‍स आणि बाहेर फेरफटका मारण्‍याचा उत्‍साहवर्धक मार्ग देतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही महिलांना भेट देता येतील अशा पाच सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्सबद्दल सांगणार आहोत.  


1. ओडीसी रेसर लाइट व्‍ही2


किंमत : 76,250 रूपये (ऑफर किंमत) 


रेसर लाईट व्‍ही2 मध्‍ये पॉवरफुल आणि वॉटरप्रूफ मोटर आहे. लिथियम-आयन बॅटरी तीन ते चार तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होण्‍याची खात्री देते आणि 75 किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये एलईडी लाईट्स आणि मोठी बूट स्‍पेस आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही सुरक्षितपणे आणि सुलभपणे तुमचे सामान स्‍टोअर करू शकता. या स्‍कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्‍टमसह तुम्‍ही पॉवर कमी होण्‍याची चिंता न करता लांबच्‍या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. या व्‍यतिरिक्‍त अॅण्‍टी-थेफ्ट लॉक स्‍कूटर वापरात नसताना सुरक्षित असण्‍याची खात्री देते.


ओडीसी रेसर लाईट व्‍ही2 आरामदायी आणि विश्‍वसनीय राईड देते. रॅडियण्‍ट रेड, पेस्‍टल पीच, सफायर ब्‍ल्‍यू, मिंट ग्रीन, पर्ल व्‍हाईट आणि कार्बन ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध ही स्‍कूटर निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल. 


2. अॅम्पियर मॅग्‍नस  


किंमत : 93,900 रूपये 


एकीकृत यूएसबी पोर्ट, एलसीडी स्क्रिन, कीलेस एण्‍ट्री आणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म असलेली अॅम्पियर मॅग्‍नस ईएक्‍स वैशिष्‍ट्य-संपन्‍न इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये प्रतितास 55 किमीच्‍या अव्‍वल गतीपर्यंत पोहोचण्‍यासाठी 1.2 केडब्‍ल्‍यू मोटर आहे, तसेच 60 व्‍होल्‍ट, 30 एएच बॅटरी आहे, जी 5 अॅम्पियर सॉकेटच्‍या माध्‍यमातून 6 ते 7 तासांमध्‍ये 0 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते. मॅग्‍नस ईएक्‍समध्‍ये 121 किमीची प्रभावी एआरएआय-प्रमाणित रेंज आहे.


3. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स


किंमत - 1,06,590 रूपये 


ऑप्टिमा सीएक्‍समध्‍ये 550 वॅट बीएलडीसी मोटर आहे, जी 1.2 बीएचपीची सर्वोच्‍च पॉवर देते. तसेच या इलेक्ट्रिक स्‍कूटरमध्‍ये 52.2 व्‍होल्‍ट, 30 एएच लिथियम फॉस्‍फेट बॅटरी आहे, जी 4 ते 5 तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. कंपनीने सिंगल आणि डबल बॅटरी व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये स्‍कूटर सादर केली आहे, ज्‍यांची किंमत अनुक्रमे 62,190 रूपये आणि 77,490 रूपये आहे. डबल बॅटरी असलेले व्‍हेरिएण्‍ट एका चार्जमध्‍ये 140 किमीची रेंज देते आणि प्रतितास 45 किमीची अव्‍वल गती प्राप्‍त करू शकते. 


4. ओकिनावा रिज 100


किंमत : 1,15,311 रूपये 


ओकिनावा रिज 100 एक व्‍हेरिएण्‍ट आणि तीन कलरमध्ये येते. या स्‍कूटरमध्‍ये पॉवरफुल 800 वॅट मोटर आणि इलेक्‍ट्रॉनिकली असिस्‍टेड ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट आणि रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. आकर्षक डिझाइन, व्‍यावहारिक वैशिष्‍ट्ये आणि 149 किमीच्‍या रेंजसह रिज 100 मध्‍ये प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सेंट्रल लॉकिंग, अॅण्‍टी-थेफ्ट सिस्‍टम, जिओ-फेन्सिंग, इम्‍मोबिलायझेशन, पार्किंग असिस्‍टण्‍स, ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग. ही स्‍कूटर जवळपास पाच ते सहा तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते आणि अव्‍वल गती प्रतितास 50 किमी आहे.


5. ओला एस1 (Ola S1)


किंमत - 1,29,999 रूपये


ओला एस1 इलेक्ट्रिक स्‍कूटरमध्‍ये कॉम्‍पॅक्‍ट डिझाइन आणि प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत. ही स्‍कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असून 8.5 केडब्‍ल्‍यू मोटरची शक्‍ती आहे. या दोन्‍ही व्‍हेरिएण्‍ट्स प्रभावी स्‍पीड्स आणि रेंजेस् देतात. रिमोट लॉक/अनलॉक, जीपीएस आणि अॅण्‍टी-थेफ्ट अलर्टस् अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह या स्‍कूटर्समध्‍ये स्‍टाईल, परफॉर्मन्‍स आणि कार्यक्षमतेचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. 


या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स परिवहनाचे शाश्‍वत आणि सोईस्‍कर मोड देतात, ज्‍या तुमच्‍या जीवनातील सक्रिय महिलांसाठी परिपूर्ण आहेत. दैनंदिन प्रवास असो किंवा वीकेण्‍डला साहसी राइडचा आनंद घ्‍यायचा असो या स्‍कूटर्समध्‍ये स्‍टाइल, परफॉर्मन्‍स आणि कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे. या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स भेट म्‍हणून देत तुम्‍ही तुमचे प्रेम आणि कौतुक व्‍यक्‍त करण्‍यासह उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी पर्यावरणास अनुकूल गतीशीलतेला चालना देखील देता.


महत्त्वाच्या बातम्या :


Car Comparison : Tata Nexon Dark ही कार Hyundai Venue Night Edition पेक्षा कशी वेगळी आहे? वाचा A to Z माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI