Summer Tips : हिवाळा ऋतू संपून उन्हाळा (Summer) लवकरच सुरु होणार आहे. अशातच उन्हाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या कारची (Car) काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा कारची सर्व्हिसिंग करायची किंवा उन्हाळ्यात नेमकी कशी काळजी घ्यावी हे कळत नाही. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची कार नीट ठेवू शकता.
उन्हाळ्यापूर्वी 'अशी' करा तयारी
देशभरात साधारण एप्रिल महिन्यापासून उन्हाळा सुरु होतो. हा हिवाळा (Winter Tips) मे, जून महिन्यांत फार कडक असतो. अशा वेळी उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणंही अवघड होऊन बसते. पण, काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अशा हवामानातही गाडीने कोणताही त्रास न होता प्रवास करता येतो.
वेळेवर सर्व्हिसिंग करा
जर तुम्हाला तुमची कार उन्हाळ्यातही सुरळीत चालवायची असेल, तर कारची नेहमी वेळेवर सर्व्हिसिंग करणं फार महत्वाचं आहे. सर्व्हिसिंग वेळेवर पूर्ण करण्यात निष्काळजीपणा केलात तर तुमच्या गाडीच्या समस्या वाढण्याचा धोका जास्त असतो. पम, जर तुमची सर्व्हिसिंग वेळेवर झाली तर येणाऱ्या अडचणींना वेळीच रोखता येते.
एसीची सुद्धा सर्व्हिसिंग करा
उन्हाळ्यात गाडी थंड ठेवण्यासाठी एसीची भूमिका फार महत्त्वाची असते. जर, तुमच्या गाडीचा एसी खराब झाला असेल तर प्रवास करणंही कठीण होतं. त्यामुळे उन्हाला सुरु होण्यापूर्वीच तुमच्या गाडीच्या एसीची सर्व्हिसिंग करून ठेवा. जेणेकरून प्रवासा दरम्यान येणाऱ्या समस्या टाळता येतील.
टायर्सची काळजी घ्या
जेव्हा एखादी कार चालवली जाते, तेव्हा रस्ता आणि कार यांचा थेट संबंध टायरशी असतो. त्यामुळे टायरची काळजी घेणंही फार गरजेचं आहे. टायरची काळजी घेण्यात काही निष्काळजीपणा आढळल्यास उन्हाळ्यात जास्त तापमानात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्यात टायरमधील हवा तपासली पाहिजे. शक्य असल्यास, अशा हवामानात कारच्या टायरमध्ये सामान्य हवेऐवजी नायट्रोजन भरणे चांगले मानले जाते. याशिवाय जर गाडीचे टायर खराब होत असतील तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ते बदलणं देखील गरजेचं आहे.
उन्हाळा सुरु होण्यापूर्वी तुम्ही कारच्या संबंधित जर या टिप्स फॉलो केल्या तर तुमची कार कधीही बंद पडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Car Comparison : Tata Nexon Dark ही कार Hyundai Venue Night Edition पेक्षा कशी वेगळी आहे? वाचा A to Z माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI