Car Comparison: देशात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने धुमाकूळ घातला आहे. यातच कंपनीने बुधवारी आपली बहुप्रतीक्षित Tiago EV भारतात लॉन्च केली आहे. मात्र आता याची तुलना याचाच मोठा भाऊ असलेल्या Tata Tigor EV शी केली जात आहे. Tiago EV आधी कंपनीने Tigor EV लॉन्च केली होती. Tigor EV ही आतापर्यंत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती. मात्र आता याची जागा Tiago EV ने घेतली आहे. आज आपण याच दोन्ही कारची तुला करणार आहोत.


कोण देते सर्वाधिक रेंज? 


इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना ग्राहक सर्वात आधी विकत घेणार असलेली कार किती रेंज देते हे पाहतात. यातच Tiago EV मध्ये 24kWh बॅटरी पॅकसह 315km ची रेंज मिळते. तर लहान 19.2kWh बॅटरी पॅकसह 250km रेंज मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच Tigor EV ला 26kWh चा बॅटरी पॅक मिळतो आणि हे कार 306km ची रेंज देते, असा दावा करण्यात आला आहे. 


पॉवर 


मोठ्या 24kWh बॅटरी पॅकसह Tiago EV  ची इलेक्ट्रिक मोटर 74bhp तयार करते. तर 26kWh बॅटरी पॅकसह Tigor EV 75bhp पॉवर जनरेट  करते. असं असलं तरी या दोन्ही गाड्या 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडतात.


फीचर्स 


Tigor EV मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑटो हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, मागील कॅमेरा आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह 7-इंचाची टचस्क्रीन सारखे फीचर्स मिळते. तर Tiago EV मध्ये कनेक्टेड कार तंत्रज्ञानाच्या नवीन आवृत्तीसह सर्व समान फीचर्स मिळतात. Tigor EV च्या ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट देखील मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 


किंमत? 


Tigor EV ची किंमत 12.4 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.6 लाख रुपयांपर्यंत जाते. लहान बॅटरी पॅकसह Tiago EV ची प्रारंभिक किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरु होते, ती टॉप-एंड प्रकार 11.7 लाख रुपयांपर्यंत जाते. Tiago EV अधिक फीचर्स आणि रेंजसह चांगली कार आहे. तर Tigor EV ज्यांना अधिक जागा आणि बूट स्पेस हवा त्यांना आवडेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत


Tata Tiago EV भारतात 8.49 लाखांच्या किंमतीत लॉन्च, या आहेत 10 महत्वाच्या गोष्टी


Car loan Information:

Calculate Car Loan EMI