Motovolt Urbn e-Bike: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. यातच दुचाकी उत्पादक कंपनी मोटोव्होल्ट मोबिलिटीने नुकतीच अर्बन ई-बाईक (Motovolt Urbn e-Bike) लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंगही सुरु केली आहे. मोटोव्होल्ट अर्बन ई-बाईक कंपनीच्या वेबसाइटवर किंवा देशभरात पसरलेल्या 100 डीलरशिपवर बुक केली जाऊ शकते.
रेंज
ही बाईक दिसायला लहान असली तरी दमदार आहे. मोटोव्होल्ट अर्बन ई-बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमी पर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये कंपनीने BIS प्रमाणित लिथियम आयन बॅटरी आणि वॉटरप्रूफ मोटरचा वापर केला आहे. या बाईकची बॅटरी काढता येण्याजोगी आहे. त्यामुळे ती बाईकवरून काढल्यानंतरही चार्ज करता येते. या ई-बाईकमध्ये कंपनीने अनेक राइडिंग मोड्स, तसेच इग्निशन की, हँडल लॉक, डिजिटल डिस्प्ले आणि अनेक फीचर्स दिले आहेत. कंपनीने ई-बाईकसह एक इंटिग्रेटेड स्मार्टफोन अॅप देखील लॉन्च केले आहे. जे ग्राहकांच्या स्मार्टफोनवर सर्व बाईकच्या हालचालींबद्दल अलर्ट पाठवते.
बाइकमध्ये मिळणार पेडल
कंपनीने या ई-बाईकमध्ये पेडल असिस्ट सिस्टम देखील दिली आहे. ही सिस्टिम बाईकची बॅटरी वाचवण्यासाठी आणि बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर काम करते. बाईकची बॅटरी डिस्चार्ज होत असताना, पेडल फिरवून बाईकची रेंज वाढवता येते. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि पॅडल दोन्ही एकत्र काम करतात. ज्यामुळे बॅटरीची बचत होते. तसेच जेव्हा बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होते, तेव्हा ती केवळ पेडलने देखील चालविली जाऊ शकते. शहरातील रहदारीत वाहन चालवणे सोपे व्हावे म्हणून कंपनीने ही बाईक आरामदायी आणि हलकी बनवली आहे. मोटोव्होल्ट अर्बन ई-बाईक ही कॉलेज आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तम ई-बाईक ठरू शकते. अर्बन ई-बाईक ही कमी-गती असलेली इलेक्ट्रिक बाईक आहे. ज्याची टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. हे बाईक चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची आणि नोंदणीची गरज नाही. या ई-बाईकच्या बुकिंगसाठी कंपनी 999 रुपये आकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत
Tata Tiago EV भारतात 8.49 लाखांच्या किंमतीत लॉन्च, या आहेत 10 महत्वाच्या गोष्टी
Car loan Information:
Calculate Car Loan EMI