भारतात रस्ते अपघातात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. अशातच एखादी कार खरेदी करताना आपण इंटरनेटचा वापर करून आपल्या हवी असलेल्या कारबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या माहितीवर कितीपट विश्वास ठेवता येईल? हा एक प्रश्न आहे. इंटरेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि कार विकत घेताना सेल्समन आपल्याला जी माहिती देतो. यात किती तथ्य आहे. हे जेव्हा आपण प्रत्यक्ष कार खरेदी करून वापरतो, त्यानंतरच आपल्याला कळतं. मात्र असं असलं तरी कार खरेदी केल्यानंतर कारच्या इतर फीचर्ससोबत तडजोड करता येते. पण कारच्या सुरक्षा संबधित फीचर्सशी कोणतीही तडजोड करणं महागात पडू शकत. यासाठीच झिरो 'Zero Accident' चे उद्दिष्ट ठेवून 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'ने कार क्रॅश टेस्ट सुरू केली आहे. या प्रोग्राममध्ये कोणतीही कार ग्राहकांसाठी किती सुक्षित आहे, याची वेगेवेगळ्या पातळीवर चाचण्या करून रेटिंग दिली जाते.
काय आहे 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'?
ग्लोबल एनसीएपी ( Global New Car Assessment Program) ही एक संस्था आहे, जी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या चाचण्या करून कारल रेटिंग देते. या प्रोग्राम अंतर्गत कारची वस्तुनिष्ठ चाचणी करून संबधित कार किती सुरक्षित आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा उद्देश आहे. ही संस्था चाचणी केलेल्या कारला 0-5 स्टार रेटिंग देते. कार कंपन्यांसाठी ग्लोबल NCAP रेटिंग खूप महत्वाची आहे. कारण रेटिंग मिळाल्याने कारचे चांगले मार्केटिंग होते. गेल्या काही वर्षांत ग्लोबल NCAP ने अनेक देशी आणि विदेशी कार कंपन्यांच्या शेकडो कारची चाचणी केली आहे. 1978 मध्ये ग्लोबल एनसीएपीने अमेरिकेत पहिल्यांदा कारची क्रॅश टेस्ट केली होती. त्यानंतर इतर अनेक देशांनीही आपल्याकडे उत्पादित कराची गुणवत्ता तपासण्यासाठी खाजगी स्तरावर NCAP प्रोग्राम सुरू केला.
आज अमेरिका एनसीएपी, युरो एनसीएपी, ऑस्ट्रेलिया एनसीएपी, जपान एनसीएपी, आशियाई एनसीएपी, चीनी एनसीएपी, लॅटिन एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी कारसाठी चाचणी रेटिंग देतात. प्रत्येक एनसीएपीमध्ये कारसाठी वेगवेगळे चाचणी प्रोटोकॉल आणि रेटिंग असतात. युरो एनसीएपीमध्ये कारच्या पुढील साईड आणि साईड पोलची चाचणी केली जाते, तर ग्लोबल एनसीएपीमध्ये, कारच्या ऑफसेटची क्रॅश चाचणी केली जाते.
कशी केली जाते क्रॅश टेस्टसाठी कारची निवड?
कोणतीही कार उत्पादक कंपनी आपली नवीन कार बाजारात लॉन्च करण्यापूर्वी 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'ला कारची क्रॅश टेस्टिंग करण्याची विनंती करते. यानंतरच कारचे क्रॅश टेस्ट केले जाते. हे क्रॅश टेस्ट करण्यासाठी संबंधित कार कंपनी कारसोबतच संपूर्ण खर्च ही ग्लोबल एनसीएपीला देते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट करण्यासाठी कार कंपनी पुरवत असलेली कार घेत नसून ही कार देशभरातील कोणत्याही कंपनीच्या डिलरशिपकडून ग्लोबल एनसीएपी घेते. ग्लोबल एनसीएपी कोणत्या डिलरशिपकडून कार घेणार आहे, याची माहिती संबधित कार कंपनीला देण्यात येत नाही. जेणेकरून कारची वस्तुनिष्ठ क्रॅश टेस्ट केली जाऊ शकेल.
कशी केली जाते क्रॅश टेस्ट? वाचा
Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI