Audi India Hike Prices : जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi) आपल्या कारचे दर वाढवणार आहे. ऑडी इंडिया 1 एप्रिल 2022 पासून आपल्या एसयूव्ही कारच्या किंमतीत 3 टक्के वाढ करणार आहे. कंपनीने आपल्या परिपत्रकात म्हटलं की, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, "ऑडी इंडियामध्ये आम्ही शाश्वत व्यवसाय मॉडेल चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. वाढत्या खर्चामुळे आणि परकीय चलन दरातील बदलांमुळे आम्हाला आमची मॉडेल श्रेणीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे.


Jeep Electric SUV : जीप कंपनीही इलेक्ट्रिक विश्वात, लवकरच दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही घेऊन बाजारात उतरणार


ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या A4, A6, A8 L, Q2, Q5, आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या Q7, Q8, S5 स्पोर्टबॅक, RS 5 स्पोर्टबॅक, RS 7 स्पोर्टबॅक तसंच RS Q8 चा समावेश आहे. ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ई-ट्रॉन 50, ई-ट्रॉन 55, ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई-ट्रॉन जीटीचा समावेश आहे.  


दमदार इंजिन, 360 डिग्री कॅमेरा, स्टाइलिंग आणि जबरदस्त स्पेस! अशी आहे नवीन 'मारुती सुझुकी बलेनो'


याआधी कार कंपनी मारुती सुझुकी, टाटा मोटर्सहीनेही वाढत्या खर्च्यामुळे आधीच कारच्या दरात वाढ केली आहे. पण या कंपन्यांन येत्या दिवसात आणखीही आव्हानांचा सामना करावा लागेल. कारण रशिया आणि युक्रेन युद्धामुळे वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहन कंपन्यांचा खर्च आणखी वाढणार आहे. त्याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल डिझेल, गाडी चालवण्यासाठी लागणारे इंधनही महाग होऊ शकते. याचा परिणाम वाहनांच्या विक्रीवर होऊ शकतो.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI