Volvo XC40 Facelift Launch : Volvo Cars India ने आज आपल्या लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यामध्ये फक्त एक पेट्रोल इंजिनचा ऑप्शन देण्यात आला आहे. जो लाईट हायब्रीड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या कारमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या.
Volvo XC40 फेसलिफ्टची वैशिष्ट्ये :
नवीन व्होल्वो XC40 फेसलिफ्टमध्ये 12.3-इंच सेकंड जनरेशन ड्रायव्हर डिस्प्ले, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर-अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, क्रिस्टल गियर नॉब, पुढच्या रांगेत दोन टाईप-सी पोर्ट, वायरलेस चार्जिंग सपोर्ट, ट्रॅफिक अलर्ट, अॅक्टीव्ह व्हॉईस कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पॅनल, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), लेदर अपहोल्स्ट्री, ईबीडी, ऑटोमॅटिक पार्किंग फंक्शन, ऑटो-डिमिंग ओआरव्हीएम, टूरिंग ट्यून चेसिस, रिअर कोलिजन मिटिगेशन सपोर्ट आणि वायर्ड ऍपल कारप्ले सपोर्ट, ड्राइव्ह मोड स्विच, मल्टी-ऑनसह AQI मीटर फिल्टर, PM 2.5 फिल्टरसह प्रगत एअर फिल्टर, 14-स्पीकर हार्मोन कार्डन साउंड सिस्टम, पायलट असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, पार्किंग क्लायमेट फंक्शन यांसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
व्होल्वो XC40 फेसलिफ्ट पॉवरट्रेन :
नवीन Volvo XC40 फेसलिफ्टमध्ये लाईट हायब्रिड 2.0-L टर्बो-पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 197bhp पॉवर आउटपुट आणि 300Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, कार 48V इलेक्ट्रिक मोटरसह लाईट-हायब्रिड प्रणालीशी जोडलेली आहे. या कारमध्ये ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टिम उपलब्ध आहे. तसेच या कारमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Volvo XC40 फेसलिफ्ट लूक कसा असेल?
नवीन व्हॉल्वो XC40 फेसलिफ्टमध्ये नवीन डिझाईन केलेले 18-इंच अलॉय व्हील, इंडिकेटर-माउंटेड ORVM, फ्रेमलेस ग्रिल, फ्लेर्ड व्हील आर्च, एअर डॅम, एलईडी हेडलाइट्ससह Volvo XC40 चा लूक ग्राहकांना आकर्षित करणारा आहे.
Volvo XC40 कोणते कलर ऑप्शन्स असतील?
नवीन Volvo XC40 फेसलिफ्ट कंपनीने एकूण पाच कलरमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये क्रिस्टल व्हाईट, फजॉर्ड ब्लू, फ्यूजन रेड, ओनिक्स ब्लॅक आणि सेज ग्रीन या रंगांचा समावेश आहे.
Volvo XC40 फेसलिफ्टची किंमत किती?
ही नवीन XC40 फेसलिफ्ट कार व्होल्वोने 43.20 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे. असे असले तरी मात्र, या कारची किंमत सणासुदीच्या काळापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 45.90 लाख रुपये असेल.
महत्वाच्या बातम्या :
- फक्त 8 दिवस शिल्लक, येत आहे नवीन Tata Tiago इलेक्ट्रिक कार
- Mahindra Thar : दिवाळीपूर्वी ग्राहकांना महागाईचा तडका; महिंद्रा थारच्या किंमतीत झाली वाढ
Car loan Information:
Calculate Car Loan EMI