Mahindra Thar Car : सध्या महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच, जिथे अनेक कार कंपन्या त्यांच्या कारवर वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे मात्र, दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra) आपल्या ग्राहकांना चांगलीच धक्का दिला आहे. महिंद्राने आपल्या स्पोर्टी कार महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे थारच्या ग्राहकांमध्ये काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे. असे असले तरी, ही वाढ सर्व मॉडेल्समध्ये एकसारखी नाही. किंमतीत वाढ झाल्यानंतर, महिंद्रा थारची किंमत 13.59 लाख रुपयांवरून (एक्स-शोरूम, दिल्ली) 16.29 लाख रुपये (टॉप-एंड मॉडेल) झाली आहे.


पेट्रोल मॉडेल्सच्या किंमती वाढल्या (Petrol Model Price Hike) :


महिंद्र थार चार पेट्रोल व्हेरिएंटमध्ये येते आणि कंपनीने तिच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने तिच्या AX (O) CT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX HT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX CT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 6000 रुपयांनी आणि LX HT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या किंमती 7000 रुपयांनी वाढवल्या आहेत.


डिझेल मॉडेल्सच्या किंमती वाढल्या (Diesel Model Price Hike) :


महिंद्रा थार सहा वेगवेगळ्या डिझेल मॉडेल्समध्ये येते. कंपनीने तिच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमतींमध्येही वाढ केली आहे. तिच्या AX (O) CT मॅन्युअल ट्रान्समिशन, AX (O) HT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX CT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX HT मॅन्युअल ट्रान्समिशन या मॉडेल्सच्या किंमती कंपनीने 28,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे, LX CT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, LX HT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 26,000 रुपयांनी वाढविण्यात आली आहे.


महिंद्रा थार इंजिन (Mahindra Thar Engine) : 


महिंद्रा थारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा थार देशांतर्गत बाजारात दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. त्याचे 2.2-लिटर mHawk डिझेल-इंजिन 130 bhp ची कमाल पॉवर आणि 300 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. आणि त्याचे 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड mStallion पेट्रोल-इंजिन 150 bhp कमाल पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क उत्पन्न करते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI