New Guideline for Cab Drivers : टाटा सन्सचे सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा 4 सप्टेंबर रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाल्यापासून केंद्र सरकारने चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट लावण्याबाबतचे नियम कडक केले आहेत. उबर (UBER) कंपनीने देखील त्यांच्या सर्व चालकांना निर्देश दिले आहेत. रिपोर्टनुसार, Uber ची प्रतिस्पर्धक कंपनी OLA ने देखील आपल्या कार चालकांना संबंधित नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय नियम आहेत? जाणून घ्या
कंपनीकडून तपासणी
सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी सायरस मिस्त्री मर्सिडीज-बेंझ जीएलसी कारच्या मागील सीटवर बसले होते, जी अत्यंत सुरक्षित कार होती. मात्र त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता आणि हे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कॅब कंपनीकडून कारचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या कारमध्ये योग्य मागचा सीट बेल्ट असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी प्रवाशांना कारच्या मागील सीट बेल्टचा वापर करता येईल. त्याचबरोबर, चालक स्वतः सीट बेल्टचे नियम पाळत आहेत की नाही? कंपनी स्वतः देखील याबाबत तपासणी करत आहे.
मागे बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागेल
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली होती की, रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, सायरस यांच्या अपघातामुळे सरकारने मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसेल तर अलर्ट वाजला जाईल. ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर त्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागणार आहे. हे सर्व कारसाठी लागू होईल.
कॅब कंपन्यांकडून कारचालकांना निर्देश
खाजगी कार तसेच कॅबमध्ये, कारच्या मागील सीटवर कव्हर बसवल्यामुळे लोक मागील सीट बेल्ट लावत नाही. जेणेकरून एखाद्याला सीटबेल्ट वापरायचा असला तरी तो करू शकत नाही. आतापर्यंत गाडीचा सीट बेल्ट न वापरण्याची तरतूद नव्हती. मात्र आता खासगी आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे, या नियमानुसार मागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे कॅब चालवणाऱ्या कंपन्याही त्यांच्या कार चालकांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI